Raja Shivaji Vs Deool Band 2: ‘देऊळ बंद 2’ची ‘राजा शिवाजी’ चित्रपटावर मात; आकडे पाहून व्हाल थक्क! – Marathi News | Raja shivaji vs deool band 2 box office collection riteish deshmukh pravin tarde movies


देऊळ बंद 2 आणि राजा शिवाजी चित्रपटImage Credit source: Instagram

यंदाचं वर्ष मराठी चित्रपटांसाठी अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. ‘क्रांतीज्योती विद्यालय : मराठी माध्यम’, ‘तिघी’, ‘राजा शिवाजी’ आणि आता ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही या मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यातही रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये एक महिना पूर्ण केला आहे. आता बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’कडून त्याला टक्कर मिळत आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपट-

1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून ‘देऊळ बंद 2’मुळे या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 24.30 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 12 कोटी रुपये कमावले आहेत. तर चौथ्या आठवड्यातील कमाईचा आकडा 4.80 कोटी रुपये इतका आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 29 व्या दिवशी 32 लाख, 30 व्या दिवशी 58 लाख आणि 31 व्या दिवशी 68 लाख रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा गेल्या 31 दिवसांमधील कमाईचा आकडा 95.17 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

‘देऊळ बंद 2’

प्रवीण तरडे यांचा हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. अवघ्या दहा दिवसांत या चित्रपटाने ही दमदार कामगिरी केली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘देऊळ बंद 2’ने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी 5 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या 24 तासांत या चित्रपटाच्या कमाईत 61 टक्क्यांची वाढ झाली आहे. रविवारच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला मागे टाकलं आहे. ‘देऊळ बंद 2’ने आतापर्यंत 50 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे रविवारी आयपीएलचा अंतिम सामना असूनही प्रेक्षकांनी ‘देऊळ बंद 2’साठी थिएटरमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, असं म्हणायला हरकत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *