पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करताय पण कुठे जायचं ठरत नाहीये? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम – Marathi News | Planning a road trip during the monsoon but not sure where to go these are the best places near mumbai


जूनच्या सुरुवातीला काही दिवसातच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, ज्यामुळे सर्वांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळेल. पावसाळा म्हंटल की अनेकजण या दिवसात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि आसपासच्या काही ठिकाणांचे मनमोहक दृश्ये पाहायला जातात. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हलक्या सरीमध्ये हिरवाशालू पांघरलेला निसर्ग पाहायचं असेल तर रोड ट्रिप करणे हे उत्तम पर्याय आहेत. या ट्रिपमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तर तुम्ही मुंबईत किंवा त्या आसपास राहत असाल तर कोणत्याही प्लॅनची गरज भासणार नाही, कारण मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर ही निसर्गरम्य ठिकाणं आहेत. चला तर मग या लेखात रोड ट्रिप्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

मुंबईच्या आसपासची ही ठिकाणं तुम्ही एक्सप्लोर करयला जालं तेव्हा तेथील रस्ते, धुक्याने वेढलेले डोंगर अधिकच सुंदर दिसतात, तर धबधबे त्यांच्या सौंदर्याच्या परमोच्च बिंदूवर असतात. या रोड ट्रिपमध्ये तुम्ही लोणावळा ते इगतपुरीपर्यंतच्या रोड ट्रिपचा प्लॅन करू शकता.

लोणावळा आणि खंडाळा

लोणावळा आणि खंडाळा ही दोन थंड हवेची ठिकाणे महाराष्ट्रात मुंबईजवळ आहेत. पावसाळ्यात चोहोबाजूंनी हिरवीगार वनराई पसरलेली हे ठिकाणं अत्यंत सुंदर दिसते. वाटेतील दृश्येही मनाला भुरळ पाडणारी असतात. हिरव्यागार वनराईतून उंचावरून वाहणारे धबधबे आणि धुक्याने भरलेले मनमोहक नैसर्गिक दृश्य पाहून तुम्हाला वाटेत थांबून, गरमागरम चहाचा आस्वाद घेत निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. येथील हवामान रोमँटिक असल्यामुळे आपल्या जोडीदारासोबत रोड ट्रिप करणे उत्तम ठरते. टायगर पॉइंट, भुशी धरण आणि राजमाची पॉइंट यांसारखी ठिकाणे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. लोणावळा मुंबईपासून अंदाजे 93 किमी अंतरावर आहे आणि तिथे पोहोचायला सुमारे 2 तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागतो.

माथेरान हे सुद्धा एक उत्तम ठिकाण आहे

पावसाळ्यात मुंबईच्या आसपास रोड ट्रिप म्हंटल की अनेकांच्या मनात माथेरान हे नाव येतचं. तर माथेरान हे देखील एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला आरामात वेळ घालवायचा असेल, तर भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. माथेरान हे ठिकाणं कमी रहदारी असलेल्या काही मोजक्या डोंगराळ भागांपैकी एक आहे. येथील लाल मातीचे रस्ते आणि निसर्गरम्य नैसर्गिक देखावे शहराच्या धावपळीतून दिलासा देतील. येथील टॉय ट्रेन हे देखील एक आकर्षण आहे. तथापि मुसळधार पावसात रस्ते निसरडे होतात आणि टॉय ट्रेनची सेवा अनेकदा थांबवली जाते. तुम्ही येथे ट्रेकिंग करू शकता. मार्गाच्या दोन्ही बाजूंची घनदाट जंगले आणि डोंगर अप्रतिम दिसतात. वाटेत अनेक धबधबे देखील आहेत.

पावसाळ्यात अलिबागला द्या भेट

पावसाळ्यात रोड ट्रिपचे प्लॅन करताना फक्त आजूबाजूला हिरवागार निसर्ग, डोंगर असेल अशा ठिकाणी फिरायला अनेकजण जातात. पण पावसाळ्याच्या दिवसात अलिबाग हे देखील एक अद्भुत ठिकाण आहे, विशेषतः जर तुम्हाला समुद्र आवडत असेल तर. पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावरून गाडी चालवणे हा एक आनंददायी अनुभव असतो. कोणत्याही हवामानात तुम्ही येथे आनंद घेऊ शकता, कारण येथे सी-फूडपासून ते राहण्यापर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून गाडीने येत असाल, तर वाटेत दिसणारी हिरवीगार डोंगररांग आणि लहान धबधब्यांची दृश्ये खरोखरच मनमोहक असतात.

नाशिकच्या या ठिकाणाला सुद्धा भेट द्या

पावसाळ्यात नाशिकला भेट देणे ही एक चांगली कल्पना आहे. सह्याद्रीचा हिरवागार डोंगर आणि ढगांनी वेढलेल्या दऱ्या व मनमोहक धबधब्यांची दृश्ये एक अद्भुत अनुभव देतात. मुंबईपासून हे ठिकाण गाडीने सुमारे चार तासांच्या अंतरावर आहे. द्राक्षांचे मळे हे देखील एक लोकप्रिय आकर्षण आहे आणि नाशिकमध्ये तुम्ही मंदिरांना भेट देण्यापासून ते तलावाकाठच्या सफरी, स्थानिक खाद्यपदार्थ आणि आरामदायी रोड ट्रिपपर्यंत सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *