World No Tobacco Day 2026 : धूम्रपान, तंबाखू वापराचे दुष्परिणाम आणि धूम्रपान तंबाखूचा वापर कसा थांबवाल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला


World No Tobacco Day 2026 : भारतातील 28.6 % (अंदाजे 26.7 कोटी) प्रौढ व्यक्ती कोणत्याही स्वरूपातील तंबाखू – धूम्रपान, धूररहित तंबाखू उदा. तंबाखू आणि चूना यांचे मिश्रण चघळणे, तंबाखू असलेले पान, दातांना मिश्री लावणे), सेवन करतात  (Global Adult Tobacco Survey GATS2, India 2016-17). 

धूम्रपानाच्या दुष्परिणामांबद्दल काही दुर्लक्षित बाबींचा विचार आवश्यक आहे. यापैकी एक आहे Passive Smoking/Second Hand Smoke Exposure. धुम्रपानामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिच्या आरोग्याची हानी होतेच पण त्याच्या अवतीभवतीच्या लोकांनाही आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. ह्याला Passive Smoking/Second Hand Smoke Exposure म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात जगभरात अंदाजे 70 लाखांहून अधिक मृत्यु तंबाखू सेवनामुळे होतात असे नमूद केले आहे. ह्यातील अंदाजे सोळा लाख मृत्यु हे Second Hand Smoke Exposure मुळे होणारे आजार मुळे होतात. म्हणजे तुम्हाला ह्या दुर्लक्षित प्रश्नIचा अंदाज येईल. ह्याचा सर्वात जास्त त्रास लहान मुले, गर्भवती महिला व वृद्ध व्यक्तिंना होतो. अंदाजे 40% स्त्रियांना घरात second hand smoke exposure होते, अस अहवालात नमूद केले आहे. धूम्रपाना बद्दलचे काही गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. खिड‌की जवळ धूम्रपान केल्यास चालेल-हे अतिशय चुकीचे आहे, असे केल्यास धूर तुमच्या घरात आणि शेजाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांना ही त्रास होऊ शकतो.  गच्चीवर धूम्रपान करणे – हे देखील अतिशय चुकीचे आहे, असे केल्यास परत दरवाजा उघडला की धूर घरात येणार. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तसेच घरातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, घरात सुद्धा धूम्रपान टाळले पाहिजे, ज्याप्रमाणे सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. 

कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचा वापर हा शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवास हानिकारकच आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा एक मुख्य गट म्हणजे असंसर्गजन्य आजार (NON-COMMUNICABLE DISEASES – NCDs). हयामध्ये श्वसन मार्गाचे आजार हृदयरोग व रक्त वाहिन्यांचे आजार, डायबिटीस आणि कर्करोग हे प्रमुख गट आहेत. आपल्या देशात अंदाजे 34% कर्करोग हे कोणत्या न कोणत्या स्वरूपातील तंबाखू सेवनामु‌ळे होतात.गेल्या काही वर्षात हे आजार कमी वयात सुरु होताना आढळत आहेत. ह्या आजारांसाठी धूम्रपान, तंबाखू, टाळता येणारे RISK FACTORS आहेत.

तंबाखू सेवन थांबवण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू विरोधी कार्यक्रम NATIONAL TOBACCO CONTROL PROGRAM (ntcp.mohfw.gov.in) अंतर्गत सरकारी जिल्हा रुग्णालयात, वैद्यकीय, दंत वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये Free Tobacco Cessation Clinics ची सुविधा आहे याशिवाय TOLL FREE NATIONAL TOBACCO QUITLINE NUMBER 1800112356 वर फोन केल्यास  समुपदेशन (counselling) केले जाते. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांसह भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे. 

कोणत्याही स्वरूपातील तंबाखू सेवन थांबवण्याचे फायदे लगेच लक्षात यायला लागतात. उदा. 2 ते 12 आठवड्यात रक्तभिसरण म्हणजे Circulation व फुफ्फुसांची क्षमता Lung Function सुधारते. साधारण 1 ते 9 महिन्यात खोकला आणि धाप लागणे कमी होते. ह्याबरोबरच आर्यूमर्यादा सुधारते. कोणत्याही वयात तंबाखू सेवन थांबवणे हे आरोग्यासाठी, खूप महत्वाचे आहे. 

सुरुवातीला थोडा त्रास जरी जाणवला तरी फायदे खूप जास्त आहेत हे कायम लक्षात ठेवायला हवे. स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी  निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. 

कधी कधी एखादी व्यक्ति उपाय योजने नंतर ही परत धूम्रपान  अथवा तंबाखू‌चा वापर करायला लागते. पण निराश न होता, पुन्हा हे व्यसन सुटण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्राणायाम, योगासन उपयुक्त ठरू शकतात.

तणाव कमी करण्यासाठी तंबाखू किंवा धूम्रपानाचा वापर करू नये

तंबाखूचे व्यसनच किशोरवयीन मुला मुलींना लागूच नये म्हणून व्यसन विरोधी उपक्रम शाळांमधून अभ्यासक्रमाचा भाग बनला पाहिजे. 2014 पासून डॉ शिल्पा देशपांडे यांच्या सहकार्याने, आम्ही मुंबईतील विविध भागांतील शाळांमधील इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा कार्यक्रम करत आहोत. आतापर्यंत 40,000 विद्यार्थ्यांसाठी केला गेला आहे व तो मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून उपयुक्त आणि फायदेशीर असल्याचा अभिप्राय मिळतो आहे. हा कार्यक्रम आपल्या देशातील धूम्रपानाबरोबरच धूररहित तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागृकता निर्माण करत आहे. असे उपक्रम आपल्या देशातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी विचार होणे गरजेचे आहे.

कोणत्याही स्वरूपातील तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आयुष्यभर टाळलेच पाहिजे आणि रोजचाच दिवस असू दे तंबाखू विरोधी दिवस!

डॉ. निता घाटे, M.S DNB, कान, नाक, घसा तज्ञ,

अध्यक्ष, Association for Tobacco Use Hazards Awareness & Preventive Measures (ATHAPM)

हे ही वाचा :

Health Tips : सुट्ट्यांमधील वाढलेला स्क्रीन टाईम आणि वाढतं तापमान मुलांच्या डोळ्यांसाठी कसं घातक? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *