‘बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात…’; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव


Vaibhav Mangale On Marathi Actors In Bollywood: आपल्या सहजसुंदर अभिनयशैली, विनोदी भूमिकांमधील अचूक टायमिंग आणि विविधांगी भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे, वैभव मांगले (Vaibhav Mangale). त्यानं आजवर अनेक गाजलेल्या मराठी नाटकांमध्ये (Marathi Drama), मालिकांमध्ये (Marathi Serials) आणि सिनेमांमध्ये उल्लेखनिय भूमिका साकारल्या आहेत. कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिकांमधून वैभव मांगलेनं आपल्या अभिनयानं सर्वांनाच थक्क केलं. हा अभिनेता जेवढा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही चर्चेत असतो.  

सध्या वैभव मांगलेंची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. यामध्ये त्यानं हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकारांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल थेट आणि स्पष्ट भाष्य केलं आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी समजलं जातं. तिथे मराठी कलाकारांना कुणीही हिरो हिरोईन म्हणून घेत नाही, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, पुढे बोलताना मला कधी त्या इंडस्ट्रीनं भूरळ घातली नाही किंवा तिथे काही केलं तरंच आपण भारी असं कधीही वाटलं नाही, असंही वैभव मांगले सांगायला विसरले नाहीत. 

अभिनेता वैभव मांगले नेमकं काय म्हणाला? (Vaibhav Mangale On Bollywood)

मराठमोळा अभिनेता वैभव मांगले म्हणाला की, “हे हे ‘मराठी’ कलाकार हिंदीत चमकणार, चमकले, चमकतील… हे फालतू कोडकौतुक पहिलं बंद केलं पाहिजे. तिथे चमकलं म्हणजे आपण भारी कलाकार का? बिनडोकपणा आहे. आम्ही इथे काम करतो, इथे आमच्यावर प्रेम करतात लोक आणि हिंदीत नाव कमावलं म्हणून कुणी मराठी रसिक हिंग लावून विचारतं नाही त्याला… बरं तिथेही कुणी हिरो, हिरोईन म्हणून घेत नाही. मराठी पार्श्वभूमी असलेल्या भूमिकाच देतात. माधुरी आणि नाना सोडले तर काही कुणी किंमत देत नाहीत तिथे… घाटी म्हणून संबोधतात…”

“एक आकस आहे, त्यांना आपल्या कलाकारांबद्दल… कधीही किंमत दिली नाही मराठी कलाकारांना… म्हणजे आमचं कमी अस्सल आणि ते अव्वल. फालतुगिरी… आमचे प्रशांत दामले, उमेश कामत, प्रिया बापट, भरत जाधव, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक, स्पृहा… खूप महत्वाचे आणि खूप खूप मोठे कलाकार आहेत… धन्यवाद. (आता काही महाभाग आपल्या कुणी काम दिलं नाही वाटतं म्हणून हे सुचतयं असं बोलतील… पण त्याना सांगून ठेवतो, मला कधी त्या इंडस्ट्रीनं भूरळ घातली नाही किंवा तिथे काही केलं तरंच आपण भारी असं कधीही वाटलं नाही)”, असं वैभव मांगले म्हणाला. 

दरम्यान, वैभव मांगले विशेषतः मराठी विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो. त्यांनी ‘टाईमपास’, ‘टाईमपास 2’, ‘बॉईज’, ‘पांडू’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमधून आणि रंगभूमीवरील प्रयोगांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे ते मराठी प्रेक्षकांचे लाडके कलाकार म्हणून ओळखले जातात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Director Sanjay Jadhav On Depression: ‘दुनियादारी’चा दिग्दर्शक संजय जाधव डाऊनफॉलमुळे डिप्रेशनमध्ये कसा गेला? दोनवेळा आयुष्य संपवण्याचा विचार मनात आला, सगळं सांगून टाकलं

ABP माझाच्या बातम्या LIVE… 

https://www.youtube.com/watch?v=Jx7-0SL4Tq4

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *