चांदीला अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानली जाते. वेदिक ज्योतिषशास्त्रात चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहांशी जोडलेला आहे. योग्य स्थितीत चांदी धारण केल्याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांतता तसेच सुख-समृद्धीही प्राप्त होते. मात्र विचार न करता चांदी परिधान करणे फायद्याच्या ऐवजी नुकसान देऊ शकते. चला तर मग पाहुयात चांदी परिधान करण्याचे ज्योतिष नियम काय आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्राचीन काळापासून धातू घालण्याची परंपरा आपल्याकडे आहे. लोक सोने, चांदी, तांबे,लोह या धातूंची अंगठी किंवा कड़ा, लॉकेट परिधान करायला पसंत करतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक धातूचा संबंध कोणत्यातरी ग्रहाशी आहे. सोन्याचा संबंध बृहस्पति ग्रहाशी आहे आणि लोखंडाचा शनि ग्रहाशी. वेदिक ज्योतिषात चांदीचा मुख्यतः चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंध आहे. पौराणिक मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शिवांच्या नेत्रांमुळे झाली असल्याने, त्याला अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानले जाते. चंद्र मन आणि भावना यांचे कारक आहे, म्हणून चांदी परिधान केल्याने मानसिक शांतता प्राप्त होते. चांदीला शुक ग्रहाशीही संबंध मानला जातो, जो सुख-समृद्धी व भौतिक सुखांचे प्रतीक आहे. त्यामुळे, चांदी धारण केल्याने कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होते. तसेच ज्योतिषशास्त्रात चांदी घालण्याचे काही नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यास चांदी घातल्याचे फायदे होतात.
चांदी घालण्याचे फायदे कुंडली पाहून चांदी घालणे शुभ मानले जाते. चंद्र उच्च नसेल किंवा राहू आणि शनि यांच्याबरोबर युती नसेल तेव्हा चांदी परिधान करणे लाभदायक ठरते. जर चंद्र कुंडलीत संतुलित असेल तर चांदी धारण करणे शुभ मानले जाते. चांदीचा फायदा म्हणजे मानसिक शांती देणे व मन मजबूत करणे आणि मनोबल वाढवतो. ज्यांच्या कुंडलीत मंगळ तीव्र आहे त्यांनाही चांदी परिधान करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे राग शांत होतो आणि मनःशांती मिळते. चांदी धारण करण्यापूर्वी कुंडलीत चंद्रसोबत इतर ग्रहांची अनुकूलता देखील महत्त्वाची असते. चंद्राशिवाय इतर ग्रहांचेही स्थान चांगले असेल तर चांदी घालणे अधिक शुभ मानले जाते.
चांदी घालण्याचे नुकसान जर कुंडलीत चंद्र, राहू किंवा शनि ग्रसित असेल किंवा चंद्र ग्रहण योगात असेल, तर अशा लोकांना चांदी घालणे टाळावी. त्यामुळे मानसिक अस्थिरता आणि वैवाहिक जीवनात समस्या वाढू शकतात. ज्योतिषात, चंद्राला मनाचा कारक मानले जाते. त्यामुळे जर चंद्र उच्च स्थानी असले तर चांदी घातल्याने मन अस्थिर बनवू शकते. चंद्र आपल्या शरीरातील जल तत्व आणि कफ नियंत्रित करतो. चांदी परिधान केल्याने चंद्राचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे मानसिक स्थितीवर खोल परिणाम होतो.
लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन सेक्शन मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर आहेत. गेल्या 10 वर्षांपासून मीडिया क्षेत्रात जर्नालिस्ट,कंटेन्ट रायटर म्हणून काम करत आहेत. धार्मिक, सांस्कृतिक,कला,सामाजिक,चित्रपट,वुमन इश्यू,मनोरंजन,वाईल्डलाईफ अशा विविध क्षेत्राशी निगडीत अनेक विषयांवर त्यांनी बातम्या आणि लेख लिहिले आहेत. धार्मिक विषयात लहानपणापासूनच रुची असल्याने व घरातील वातावरण देखील धार्मिक असल्याने त्यांनी पूजापाठ,व्रत,पारायण याची शिकवण आपल्या आईकडून घेतली. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांची आई दत्तगुरूंची सेवा करते. घरात पारायण होतात धार्मिक यात्रा दरवर्षी कुटुंब करते याच गोष्टी त्यांनी बालपणापासून पाहिल्या व आत्मसात केल्या. त्या स्वतः हनुमानजींची भक्ती करतात. आपल्या धार्मिक अनुभवांवरून लेखन करताना वाचकांपर्यंत सत्य धार्मिक लेख,कथा ज्योतिष उपाय त्यांच्या लेखनातून पोहचवतात.
प्रियांका लोंढे यांनी मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉम एस्ट्रो रिलिजन टीममध्ये कार्यरत असून ज्योतिष,टॅरोट कार्ड्स,अंकशास्त्र,धार्मिक कथा कहाण्या यामध्ये त्यांना आवड असल्याने त्यांनी यासर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे. आपल्या लेखातून त्या नेहमी ज्योतिषीय बातम्या लिहिताना तथ्य पडताळून योग्य संदर्भ देऊन वाचकांपर्यंत सत्य माहिती पोहचवतात. या बाबतीत त्यांना स्वतःचे अनुभव कामी येतात. प्रियांका स्वतः धार्मिक असल्याने त्या अनेक तीर्थस्थळी यात्रा करतात. आपल्या यात्रेतील अनुभव पाठीशी घेऊन तसेच दैनंदिन पूजापाठ कशाप्रकारे करावी संकल्प कसा घ्यावा मनोकामना प्राप्तीसाठी काय करावे हे सर्व त्या स्वतः अनुभव घेऊन आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत पोहचवतात त्यामुळे त्यांचे लेख वाचकांच्या जास्त जवळ जाऊ शकतात व वाचकांना योग्य ती माहिती मिळते.
धार्मिक लेखनासोबतच प्रियांका लोंढे यांनी महिलांसाठी लेखन केले आहे. त्यांनी लोकमत या वृत्तपत्रात असताना नाईट शिफ्ट करणाऱ्या महिला रात्री प्रवास करताना सुरक्षित असतात का या बाबतीत लोकमत टीमसोबत स्टिंग ऑपरेशन केले होते. ही बातमी वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचली व त्यांच्या टीमचे कौतुक झाले. या स्टिंग ऑपरेशनसाठी त्यांना “रणरागिणी” हा पुरस्कार मिळाला होता. सामाजिक संस्थांसोबत जोडून त्यांनी अनाथ मुले,महिला यांच्या समस्या आपल्या लेखनातून समाजासमोर मांडल्या. सध्या त्या धार्मिक लेखन करत असून आपल्या लेखनातून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहचवता यावी यावर विशेष लक्ष देतात. प्रियांका आपल्या लेखात काही ज्योतिष उपाय सांगतात जे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून असतात शिवाय लाल किताब किंवा ज्योतिष एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख त्या लिहितात.
शिक्षण व कार्य अनुभव
– प्रियांकाने 4 वर्ष लोकमत वृत्तपत्रात विविध विषयांवर पत्रकार म्हणून लेखन केले. त्यांनी अनेक स्टोरीज या एक्लुझिव्ह लिहिल्या आहेत. लोकमतसाठी मनोरंजन विभागात काम करताना बऱ्याच सेलिब्रिटीजचे इंटरव्यू घेतले. तसेच अनेक चित्रपटांचे रिव्ह्यू देखील केले आहेत. क्राईम बीटसाठी काम करताना स्टिंग ऑपरेशन केले आहेत.
– ईटीव्ही मराठीमध्ये एंटरटेनमेंट डेस्कसाठी कंटेन्ट एडिटर म्हणून काम केले आहे.
– महाराष्ट्र मीडिया पीआर कंपनीमध्ये VSTF या महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी काम केले. तसेच अनेक नामांकित ब्रँडसाठी कंटेन्ट रायटिंग केले आहे.
– ब्लूपॅड या अँपमध्ये अनेक विषयांवर 1000 हुन अधिक लेख लिहिले आहेत.
– एस्ट्रोटॉक या अँपमध्ये देखील कंटेन्ट रायटर या पदावर काम केले आहे. ज्योतिषीय विषयांवर अभ्यास व रिसर्च करून लेखन केले आहे.
– प्रियांका सध्या महाराष्ट्र टाईम्स.कॉमच्या एस्ट्रो रिलिजन सेक्शनसाठी कार्यरत आहे. येथे त्या ज्योतिष व धार्मिक विषयांवर स्वतःचे अनुभव, अभ्यास व रिसर्च करून लेख लिहितात.… आणखी वाचा