Abhijeet Dipke: जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बॅकफूटवर काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून वादात अडकली आहे. विनीत जोशी यांना शिक्षण मंत्रालयातून हटवण्यात आले आहे. विनीत जोशी हे उच्च शिक्षण विभागाचे सचिव होते. राजस्थान केडरचे अधिकारी नरेश पाल गंगवार हे उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव असतील. केरळ केडरचे अधिकारी टी. के. अनिल कुमार यांची शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हा देशभरातील तरुणांचा थेट अपमान
या बदलावर काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हल्लाबोल केला आहे. सरकार उत्तरदायित्व (जबाबदारी) निश्चित करण्याऐवजी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचा हल्लाबोल केला आहे. पेपर लीक आणि NEET संदर्भातील संपूर्ण संकट हे व्यवस्थेतील भ्रष्टाचाराशी संबंधित होते. अशा वेळी एका अधिकाऱ्याला हटवून त्याच्या जागी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याला आणणे, हा देशभरातील तरुणांचा थेट अपमान असल्याचा हल्लाबोल केला आहे.
तोपर्यंत आम्ही थांबणार नाही
अभिजित दिपके यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सरकार उत्तरदायित्व (जबाबदारी) निश्चित करण्याऐवजी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. काल रात्री शिक्षण सचिवांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पशुसंवर्धन विभागातील अशा एका IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पेपर लीक आणि NEET संदर्भातील संपूर्ण संकट हे व्यवस्थेतील भ्रष्टाचाराशी संबंधित होते. अशा वेळी एका अधिकाऱ्याला हटवून त्याच्या जागी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याला आणणे, हा देशभरातील तरुणांचा थेट अपमान आहे.
हाच तो ‘तडजोडीचा मार्ग’ आहे का?
ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे की, सरकारने आम्ही स्वीकारावा अशी अपेक्षा केलेला हाच तो ‘तडजोडीचा मार्ग’ आहे का? याला उत्तरदायित्व म्हणत नाहीत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.
रोहित पवार यांचीही सडकून टीका
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही तोफ डागली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, NEET घोटाळ्याला जबाबदार असलेले धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी असताना नाहक अधिकाऱ्यांची बदली करून काहीही साध्य होणार नाही. त्यातही नवीन सचिव यांच्यावरच स्वतःच्या कुटुंबाला हॉर्टिकल्चर मिशनमधून 1.16 कोटींची सबसिडी मिळाल्याचा आरोप आहे. इतकेच काय तर गेल्यावेळेस NTA मध्ये घोटाळा केलेल्या सुबोध कुमार सिंग यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून प्रमोशन देण्यात आले होते.
ज्यांनी घोटाळे केले त्यांना बढती द्यायची
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, म्हणजे ज्यांनी घोटाळे केले त्यांना बढती द्यायची, हीच भाजपा सरकारची modus operandi आहे का? स्वतःच्या कुटुंबालाच केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या सबसिडीचा लाभ मिळवून देणारे नवे सचिव या देशाच्या तरुणाईला न्याय देतील का? त्यामुळे असे कागदी घोडे नाचवून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करणे सरकारने तत्काळ बंद करावे. आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवा आहे, बाकी नंतर बघू असे त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय