पुणे: पुण्यातील घोरपडी पेठ भागात गोळीबाराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुजल परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी नूर शेख नावाच्या (Pune Crime News) तरुणावर थेट गोळीबार केला. या घटनेत नूर शेख गंभीर जखमी (Pune Crime News) झाला असून त्याला तातडीने (Pune Crime News) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य हल्लेखोर सुजल परदेशी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.(Pune Crime News)
Pune Crime News : नेमकी काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडी पेठ परिसरात सुजल परदेशी आणि त्याच्या काही साथीदारांनी नूर शेख याला गाठून त्याच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने नूर शेख रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गोळीबाराच्या या आवाजाने परिसरात एकच घबराट पसरली आणि नागरिकांची धावपळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी नूर शेख याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्याच्या पाठीत गोळी लागली असून, वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.(Pune Crime News)
Pune Crime News : हल्लेखोर सुजल परदेशी अटकेत
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर सुजल परदेशी आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयित आरोपी सुजल परदेशी याला पळून जात असतानाच पाठलाग करून तातडीने ताब्यात घेतले. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे काही अन्य कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.(Pune Crime News)