Dahisar Accident News : मुंबईतील दहिसर पूर्व येथील आरटी परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कारने अचानक अनेक पादचाऱ्यांना धडक दिली आहे. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अन्य काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि धावपळ उडाली आहे. स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
ठाण्यात झाड कापताना दुर्घटना; मजुराचा दुर्दैवी मृत्यू
ठाण्यातील बाळकुम येथील गौतम नगर पाडा क्र. ३ परिसरात चाळीवर पडलेले झाड कापण्याचे काम करत असताना अचानक पत्रा तुटून पडून एका 42 वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. बालाजी काशिनाथ डोंगरे (रा. वाघबीळ) असे मृत मजुराचे नाव असून ते पालिका वृक्ष प्राधिकरणाच्या ठेकेदाराकडे कार्यरत होते.झाड कापताना पत्रा तुटल्याने बालाजी खाली पडले आणि त्याचवेळी झाडाचा मोठा ओंडका त्यांच्या अंगावर कोसळला. त्यांना तत्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर कापूरबावडी पोलीस ठाणे आणि महापालिका प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरू आहे.
भिवंडी शहरात भीषण अपघात, पिकअप टेम्पोने तीन दुचाकींचा केला चुराडा
भिवंडी शहरातील अजय नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या पिकअप टेम्पोने गॅरेजसमोर उभ्या असलेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या धडकेच्या जोरात गॅरेजसमोरील पत्र्याचे शेडही कोसळले आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी गॅरेजमध्ये कोणताही कर्मचारी किंवा ग्राहक उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आणि गॅरेजसमोरील पत्र्याचे शेडही जमीनदोस्त
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येत असलेल्या पिकअप टेम्पोवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. टेम्पोने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकींना धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आणि गॅरेजसमोरील पत्र्याचे शेडही जमीनदोस्त झाले. अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ निजामपूरा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त पिकअप टेम्पोचा चालक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शहरातील भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया