Akola : अकोला जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याने कारागृह परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, संबंधित कैद्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरही त्याच्यावर विशेष देखरेख का ठेवण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्राथमिक तपासात त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर
मृत बंदीचे नाव अनिल ओंकार निंबोकार, वय 40 रा. यावलखेड, अकोला असे आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत अकोला मध्यवर्ती कारागृहात होता. गुरुवारी इतर बंद्यांसोबत कारागृह परिसरातील शेतात काम सुरू असताना तो “पाणी आणतो” असे सांगून विहिरीकडे गेला. मात्र बराच वेळ परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. प्राथमिक तपासात त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार, पत्नीची हत्या केल्यानंतर अनिलने विष प्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता आणि तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे अशा बंदीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे अकोला मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि बंद्यांच्या देखरेखीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया