Beed : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खते आणण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याचा हायवा खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या केजमधून काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. बीडच्या अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला.
केजच्या भवानी चौकात धारुर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने खते आणण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याला चिरडल्याची घटना घडलीय. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीहून जात असलेल्या नितीन आदिनाथ चाटे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. इतकच नाही तर या अपघातात त्याच्या शरीराचे दोन भाग झाल्याने घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले. घटनेनंतर अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.अपघाताच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जगबुडी नदीत कोसळलेल्या मालवाहू ट्रकच्या चालकाचा मृतदेह सापडला, बचाव पथकाला यश
काल सायंकाळी 6 वाजून 31 मिनीटांनी मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक भरधाव वेगाने येत असताना नियंत्रण सुटून जगबुडी नदीत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली होती. पुलावरून सुमारे 100 फूट खाली नदीत पडलेला ट्रक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जवळपास 400 मीटरपर्यंत वाहून गेला. या अपघातात ट्रकचा चालक वाहनातच अडकून पडला होता. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र नदीचा वेगवान प्रवाह, खोल पाणी आणि ट्रकचे अवघड स्थान यामुळे चालकापर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर आज बचाव पथकाने अथक प्रयत्न करत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत चालकाची ओळख व अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया