Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर ‘बेबी बॉस’ म्हणाला…


Vaibhav Sooryavanshi हरारे :  भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीचा व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. बीसीसीआय टीव्हीवरील त्या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडमधील अपयशावर भाष्य केलं आहे इंग्लंडमध्ये अपयश आलं असलं तरी झिम्बाब्वे विरोधातील मालिकेपासून नवी सुरुवात करण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज आहे.वैभव सूर्यवंशीच्या मते गेल्या चार महिन्यांमध्ये त्याच्या करिअरमध्ये चढ उतार आले. मात्र, आत्मविश्वास पहिल्यासारखा मजबूत असल्याचं देखील त्यानं स्पष्ट केलं. 

क्रिकेटमध्ये असं होत असतं

बीसीसीआय टीव्ही सोबत बोलताना वैभव सूर्यवंशी म्हणाला की, गेल्या चार महिन्यात अनेक चढ उतार आले. क्रिकेटमध्ये असं होत राहतं. मला फक्त माझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा आहे आणि टीमसाठी माझ्याकडून 100 टक्के योगदान द्यायचं आहे. टीम मॅनेजमेंट आणि कोचिंग स्टाफ सातत्यानं सहकार्य करत आहे. जे मला हवं असतं मग मार्गदर्शन असो, अभ्यास असो प्रशिक्षक सर्व उपलब्ध करुन देतात. मला चांगलं वाटतं,माझ्यामध्ये पूर्णपणे आत्मविश्वास आहे, असं वैभव सूर्यवंशीनं म्हटलं.

 बेबी बॉस अशी ओळख मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीसाठी झिम्बाब्वेतील हरारेचं मैदान खास आहे. कारण, याच मैदानावर चार महिन्यांपूर्वी अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड विरोधात 80 बॉलमध्ये 175 धावा केल्या होत्या. वैभवच्या या खेळीमुळं भारताला विजय मिळाला होता.  

वैभव सूर्यवंशी म्हणाला की हे मैदान माझ्यासाठी खास आहे. चार महिन्यांपूर्वी आम्ही इथं अंडर-19 वर्ल्ड कप फायनल जिंकली होती. भारताचं प्रतिनिधीत्व करणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आता त्याच मैदानावर पुन्हा खेळताना वेगळाच अनुभाव असेल, असं वैभव सूर्यवंशीनं म्हटलं.  

जुन्या अनुभवाचा फायदा होणार 

वैभव सूर्यवंशी म्हणाला की हरारेची खेळपट्टी आणि परिस्थिती चांगली माहिती आहे. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये इथं खेळल्यानं तिथल्या परिस्थितीची चांगला अनुभव आहे. या अनुभवाचा वापर या टी 20 मालिकेत करणार आहे. मी पूर्ण तयारी केली असू माझ्या खेळावर विश्वास ठेवणार असून संघासाठी जितकं योगदान द्यायचं आहे तितकं देणार असल्याचं वैभवनं म्हटलं.

झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयांक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).

भारत आणि झिम्बाब्वे टी 20 मालिकेतील तीन सामने  23 जुलै, 25 जुलै आणि 26 जुलै या दिवशी होतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी साडे चार वाजता सामने सुरु होतील. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *