Rahul Gandhi: गेल्या 10 वर्षांत 152 पेक्षा जास्त पेपर लीक झाले आहेत, ज्यामुळे सुमारे 7.5 कोटी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपर लीक होऊनही गेल्या 10 वर्षांत एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. वर्षानुवर्षे 8 ते 10 तास अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांऐवजी 40-50 लाख रुपये मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी मिळत असल्याचा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. धर्मेंद्र प्रधान अपयशी शिक्षण मंत्री ठरल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत तीन मागण्या मोदी सरकारसमोर मांडल्या आहेत. राहुल यांनी धर्मेंद्र प्रधानांचा तत्काळ राजीनामा, विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आणि मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी राहुल यांनी केली. विद्यार्थी दहशतवादी नाहीत, त्यांच्यावर पेलेट गन चालवल्या गेल्याचे राहुल म्हणाले.
भारत सरकारचे शिक्षण बजेट 1.4 लाख कोटी रुपये आहे. भारतीय कुटुंबे नीट परीक्षेवर 1.32 लाख कोटी रुपये खर्च करतात. नीटचा खर्च देशाच्या शिक्षण बजेटपेक्षा जास्त असल्याचे राहुल म्हणाले.
शिक्षण व्यवस्था परवडणारी उरलेली नाही
राहुल म्हणाले की, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी सध्याची शिक्षण व्यवस्था परवडणारी उरलेली नाही. देश जितका निधी शिक्षण बजेटसाठी देतो, तितकाच पैसा नीट (NEET) परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून वसूल केला जातो. विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासमोर रोजगाराचे पर्याय कमी होत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, चिनी वस्तूंच्या आक्रमणामुळे आणि लघुउद्योगांच्या समस्येमुळे उत्पादनातील रोजगाराचे दरवाजे बंद झाले आहेत. बँकांचे कर्ज आणि आर्थिक पाठबळ केवळ मोजक्या मोठ्या व्यावसायिकांनाच मिळते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे या क्षेत्रांतील नोकऱ्यांवर परिणाम होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर