रात्रीच्या अंधारात गाठलं, मोबाईलमधील ‘ती’ एक गोष्ट दाखवली अन्… नालासोपारातील संतापजनक प्रकार | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Nalasopara News : नालासोपाऱ्यात एका महिलेला धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबींचा गैरफायदा घेत तिला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांकडे धाव घेण्यात आली असून तपास सुरू आहे.

News18
News18

नालासोपारा : नालासोपाऱ्यातील नानभट रोड परिसरात अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. कामावरून घरी परतणाऱ्या एका महिलेला रात्रीच्या वेळी भररस्त्यात अडवण्यात आले. त्यानंतर आरोपीने मोबाईलमधील एक गोष्ट दाखवत असे कृत्य केले की महिला घाबरून गेली. नेमकं त्या रात्री काय घडलं जाणून घ्या.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना सतरा जुलै रोजीच्या रात्री घडली. पीडित महिला तिचे काम संपवून घराच्या दिशेने जात होती. या दरम्यान जेव्हा महिला नानभट रोड या परिसरात पोहोचली तेव्हा अचानक आरोपीने तिला रस्त्यात गाठले. आरोपीने एक मोबाईल काढला आणि या महिलेचे काही खाजगी फोटो दाखवले. त्यानंतर आरोपीने तिला तिचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला शिवाय भरस्त्यात तिचा विनयभंक केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला अत्यंत घाबरुन गेली होती.

कामावरुन घरी परतत असताना घडलं…

आरोपीने धक्कादायक कृत्य केलं आणि तो एवढ्यावरच न थांबता, जर घडलेला प्रकार कोणाला सांगितला किंवा पोलिसांत तक्रार केली, तर त्याचे सर्व गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि जीवे मारण्याची ही धमकी आरोपीने महिलेला दिली. यामुळे पीडित महिला प्रचंड तणावाखाली गेली होती. मात्र आरोपीच्या धमकीला न घाबरता महिलेने हिंमत दाखवत बोळींज पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार सांगितला.

महिलेच्या तक्रारीवरुन बोळींज पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात तातडीने गुन्हा नोंदवला. मात्र या घटनेमुळे परिसरातून जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/

रात्रीच्या अंधारात गाठलं, मोबाईलमधील ‘ती’ एक गोष्ट दाखवली अन्… नालासोपारातील संतापजनक प्रकार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *