John Abraham Buys Bungalow: बॅालिवुडचा अॅक्शन मॅन जॅान अब्राहम याने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज (John Abraham) दिली आहे. त्याने मुंबईमधील प्राइम लोकेशनवर (Luxury Property) एक लक्झरी बंगला खरेदी केला आहे. जॉन अब्राहम आपल्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी (Entertainment) ओळखला जातो. त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्यानं नुकतंच घर खरेदी केलं आहे. अभिनेत्याने कोटींच्या घरात पैसे मोजून घर विकत घेतलं आहे. जॉन अब्राहमने बॉलिवूडमध्ये दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम केलं आहे. अभिनेता सध्या प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने किती कोटींचे घर घेतले? जाणून घेऊयात.
रियल एस्टेट कंसल्टेंसी फर्म ‘लियासेस फोरस’ च्या रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अॅक्टर जॉन अब्राहमने पॉश परिसरात म्हणजेच वांद्रे पश्चिम येथे बंगला खरेदी केला आहे. त्याने आपल्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये आणखी एक घर अॅड झालं आहे. अभिनेत्याने हे घर घेण्यासाठी किती कोटी मोजले असतील? हा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. अभिनेत्याने वांद्रे येथील पॉश परिसरात घर विकत घेण्यासाठी अभिनेत्याने 84 कोटी ही तगडी रक्कम मोजली आहे.
जॉन अब्राहमनं किती अन् नेमकं कुठे घेतलं घर? (John Abraham Buys Luxury home at bandra west)
मिळालेल्या माहितीनुसार, त्याची ही प्रॉपर्टी वांद्रे पश्चिम येथील सेंट मार्टिन्स रोडवर आहे. या परिसरात इतर कलाकारांच्याही प्रॉपर्टीज असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा करार 14 जुलै, 2026 ला झाला होता. ही मालमत्ता 1,017.60 चौरस मीटरच्या भूखंडावर बांधलेली आहे, ज्यामध्ये 31.50 चौरस मीटरचे एक आऊटहाऊस आणि 193.12 चौरस मीटरचे बिल्ड अप एरियातील बंगला आहे. या बंगल्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी अभिनेत्याने 5 कोटी मोजले. तसेच 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.
जॅान अब्राहम मुंबईच्या वांद्रे येथील समुद्राच्यासमोर डुप्लेक्स पेंटहाऊसमध्ये राहतो. याची किंमत जवळ जवळ 60 कोटी इतकी असल्याची माहिती आहे. द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, जॉनने मुंबईत आपले तीन फ्लॅट भाड्याने दिले आहेत. GQच्या अहवालानुसार, अभिनेत्याकडे अमेरिकेच्या लॅास एंजिल्समध्येही एक लक्झरी प्रॉपर्टी आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, जॉनची लंडनमध्येही एक आलिशान प्रॉपर्टी असल्याची माहिती आहे. सध्या त्याने वांद्रे येथील पॉश एरियात थेट बंगला घेतल्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे. चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘मला काम हवंय…’; 10 वर्षांत एकाही सिनेमाची ऑफर नाही, अर्चना पूरन सिंह झाली भावूक, म्हणाली…