Swara Bhaskar Husband fahad Ahmad Viral Video: नीट (NEET) पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराविरोधातील आंदोलन आता केवळ दिल्लीपुरती (Swara Bhaskar) मर्यादीत राहिलेला नाही, तर भारतभर याचे पडसाद (Fahad Ahmed) उमटू लागले आहेत. सोमवारी मुंबईतही काही लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. ‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या समर्थनार्थ लोकांनी आंदोलन छेडलं आहे. काल दिल्लीतील संसद भवनाबाहेर जनतेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची (CJP Protest) मागणी केली. मुंबईतही तरुणांनी आंदोलन करुन रान पेटवलं होतं. अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अॅक्टिव्हिस्ट आणि राजकीय कार्यकर्ता फहाद अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्करने व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. तिनं पोस्ट शेअर करुन पतीला अटक केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली.
स्वरा भास्करच्या पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात (Swara Bhasker shares Fahad Ahmad Video)
अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आंदोलनादरम्यान, पोलीस फहादला कॉलर पकडून व्हॅनमध्ये नेत आहेत. क्लिपमध्ये फहाद पोलिसांना, ‘तुम्ही मला अटक का करत आहात?’ असा प्रश्न विचारताना दिसत आहे. हा व्हिडीओ साधारण 4:30 च्या दरम्यान शूट करण्यात आला असल्याची माहिती आहे. स्वराने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ शेअर करत स्वराने सांगितलं की, फहाद आणि इतर आंदोलकांना माहिम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, ‘मुंबई पोलिसांनी 20 जुलै दुपारच्या 4:30च्या दरम्यान, चैत्यभूमी येथून फहाद आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यांना माहिम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. हीच भारताची लोकशाही आहे…लाजिरवाणी बाब आहे’, असं म्हणत स्वराने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केला आहे.
सध्या सोशल मीडियावर फहाद यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, चाहत्यांनी त्यांना सोडण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. फहाद यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत फहाद पोलीस व्हॅनमध्ये बसला असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओतून फहाद यांनी घटनास्थळावरील परिस्थितीचे वर्णन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘पता चला किसी शहंशाह को’..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल