ट्रेनमध्ये जास्त सामान घेऊन जात असाल तर सावधान! रेल्वेचा हा नियम पाहाच, लागू शकतो मोठा दंड  | बिझनेस


Last Updated:

Train Luggage Rules: तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल. तर भारतीय रेल्वेचा हा नियम अवश्य जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा दंड लागू शकतो.

ट्रेन लगेज रूल
ट्रेन लगेज रूल

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक नेहमीच रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करत असताना तुम्हीही जास्त सामान घेऊन जात असाल. तर ही बातम्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वेने सामान नेत असताना एक नियम तुम्हाला माहिती असायला हवा. रेल्वेनेद्वारे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वजनाचं सामान्य कोणत्याही बुकिंगशिवाय सोबत घेऊन प्रवास केल्यास अतिरिक्त शुल्कासह लगेजच्या दराच्या 6 पटपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. यामुळेच अतिरिक्त सामानाला आधीच लगेच कार्यालयात बुक करणं योग्य ठरतं.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना लगेच नियमांचं कठोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या जोधपूर मंडळाचे मंडळ रेल्वे प्रबंधक अनुराग त्रिपाठी यांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक प्रवास श्रेणीसाठी निःशुल्क सामान घेऊन जाण्याची मर्यादा ठरवली आहे. एखादा प्रवासी या मर्यादेपेक्षा जास्त सामान विना बुकिंग घेऊन प्रवास करताना आढळला. तर अतिरिकत् वजनाचवर लगेज दराच्या सहा पटपर्यंत शुल्क वसुल केलं जाऊ शकतं.

35 किलोग्रामपर्यंत वजन निःशुल्क 

एवढंच नाही, रेल्वेने असंही म्हटलं आहे की, व्यापारिक किंवा व्यावसायिक सामान, मोठे ट्रंक, पोते आणि कार्टनला प्रवाशी बर्थवर घेऊन जाण्यास मनाई आहे. अशा सामानाची ब्रेक व्हॅनमध्ये बुकिंग करणं अनिवार्य राहील. त्रिपाठी यांच्यानुसार, एसी प्रथम श्रेणीमध्ये 70 किलोग्राम, एसी द्वितीय टियर/प्रथम श्रेणीमध्ये 50 किलोग्राम, एसी तृतीय टियर/एसी चेयर कारमध्ये 40 किलोग्राम, स्लीपर श्रेणीमध्ये 40 किलोग्राम आणि द्वितीय श्रेणीमध्ये 35 किलोग्रामपर्यंत सामान हे निःशुल्क घेऊन जाता येतं.

बुक करुन ब्रेक व्हॅन (लगेज व्हॅन) ने पाठवावं लागेल 

रेल्वेनुसार एखादं अतिरिक्त सामान फक्त निर्धारित मार्जिनल अलाउंसच्या आत असेल. तर त्यावर लगेज दराच्या 1.5 टक्के शुल्क घेतलं जाईल. तसंच जास्तीत जास्त मर्यादेपेक्षा जास्त सामान प्रवाशांच्या डब्ब्यात घेऊन जाण्याची परवानगी नाही. अशा वस्तूंचा प्रवास सुरू होण्यापूर्वी स्टेशनवरील सामान कार्यालयात (लगेज ऑफिसमध्ये) नोंदणी करून त्या ‘ब्रेक व्हॅन’द्वारे (सामान वाहून नेणाऱ्या डब्याद्वारे) पाठवणं आवश्यक आहे.

प्रवासी कोचमध्ये सामान नेण्यास मनाई

हा नियम MST (मासिक सीझन तिकीट) धारकांनाही लागू होतो. MST असल्यामुळे सामानाच्या मर्यादेबाबत कोणतीही अतिरिक्त डिस्काउंट मिळत नाही. वरिष्ठ DCM हितेश यादव यांच्या मते, प्रवासी डब्यांमध्ये मोठ्या आकाराच्या वस्तू—जसे की मोठे ट्रंक, पेट्या, सुटकेस, व्यवसायाचं सामान, पोती आणि कार्टन्स—नेण्यास बंदी आहे. अशा वस्तूंमुळे प्रवाशांना चढताना व उतरताना अडथळा निर्माण होतो आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोका निर्माण होऊ शकतो.

मराठी बातम्या/मनी/

ट्रेनमध्ये जास्त सामान घेऊन जात असाल तर सावधान! रेल्वेचा हा नियम पाहाच, लागू शकतो मोठा दंड 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *