Kangana Ranaut on cockroach janta party protest: बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) आज पावसाळी अधिवेशनात (Delhi Jantar Mantar) सहभागी होण्यासाठी संसदेत दाखल झाली होती. यावेळी कंगनाने संसद भवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना विरोधक तसेच आंदोलनकर्त्यांवर तिखट शब्दांत टीका केली. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल तसेच विरोध दर्शवल्याबद्दल तिने विरोधकांवर तिखट शब्दांत प्रहार केला. कुणाला ठेवावे आणि कुणाला काढून टाकावे, यासाठी सरकारवर कुणीही दबाव टाकू शकत नाही, असंही यावेळी कंगना म्हणाली.
संसद भवनबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना कंगना म्हणाली, ‘संसदेत अधिवेशन या कारणासाठी असते, जेणेकरुन आपण विविध विषयांवर चर्चा करु शकू. आमची अशी इ्च्छा आहे की, अधिवेशन सुरु राहिलं पाहिजे. जेणेकरुन आम्ही आमचे प्रश्न मांडू शकू. पण जर गोंधळ घालणार असतील त्रास दिला तर, ते काही योग्य नाही. कारण जनतेनं ज्या सरकारला निवडले आहे, ते सरकार कसं चालवायचं, हा आमचा अधिकार आहे’, असं कंगना म्हणाली.
‘कुणाला ठेवायचे आणि कुणाला काढून टाकायचे, हे ठरवण्यासाठी तुम्ही सरकारवर दबाव आणू शकत नाही’, असंही कंगना म्हणाली. ‘तुम्ही सरकारचे हात पिरगळू शकत नाही. कुणाला काढून टाकावे, कुणाला ठेवावे .. हे एक प्रकारे हात पिरगळण्यासारखे आहे, (दबाव आणणे) जे मुळात चांगले नाही’, असं पत्रकारांशी बोलताना कंगना म्हणाली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत गदारोळ (Kangana on Opposition)
आज सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार बाधित झाले होते. यावेळी विरोधकांनी नीट – युजी 2026 परिक्षेतील अनियमितता, शिक्षण व्यवस्थेच्या निगडीत काही प्रश्न आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या देणगी अपहाराच्या आरोपांवर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केली. विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच राहिल्यामुळे दुपारी 12 वाजेच्या दरम्यान कामकाज तहकूब करण्यात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या: