मात्र, मराठीत अभिनय करण्यापूर्वी तिने पाहिलेला पहिला मराठी चित्रपट कोणता होता, याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. जिनिलीयाने सांगितले की, रितेशने तिला सर्वप्रथम ‘जोगवा’ हा चित्रपट दाखवला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘जोगवा’सारखा वास्तववादी आणि प्रभावी चित्रपट मी याआधी कधीच पाहिला नव्हता. हा चित्रपट आणि त्यातील संगीत दोन्ही मनाला भिडणारे आहे.’