अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना


Pune Crime News : पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. कागदपत्र अपुरे असल्याने अधिकाऱ्याने दस्त नोंदणी करण्यास नकार दिला. यानंतर चक्क  कार्यालयातच अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यात आंबेगाव इथ ही घटना घडली आहे.अपुऱ्या कागदपत्रांमुळे दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्याच्या रागातून सह दुय्यम निबंधकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.  

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील आंबेगाव मधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवारी धक्कादादायक घटना घडली आहे. अपुऱ्या कागदपत्रांमुळे दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्याच्या रागातून सह दुय्यम निबंधकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी सायंकाळी आरोपी वकील,त्याचा भाऊ, तसेच आणखी एक जण दस्तनोंदणीसाठी कार्यालयात आले.द स्तनोंदणीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जोडली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दस्तनोंदणी करता येणार नाही असे कोळी यांनी तिघांना सांगितले. आरोपी वकिलासह साथीदारांनी कोळी यांना बांबूने मारहाण केली. मारहाणीत ते जखमी झाले आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत धक्कादायक घटना, एका महिलेने आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या मुलीला संपवलं

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत धक्कादायक घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीच्या छळाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर या आईने सहा वर्षांच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आई, मी शाळा शिकते, मला मारु नकोस, अशी आर्त विनवणी मुलीने करताच तिचा जीव बचावला आहे. 

मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मला अटक करा, अशी कबुली पोलिसांसमोर तिने दिली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1) आणि 109 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *