OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?

ZEE5 Movies Webseries: वीकेंडला घरबसल्या काही दर्जेदार आणि विचार करायला लावणारे चित्रपट किंवा वेबसीरिज (OTT) पाहायच्या असतील, तर ZEE5 हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कोर्टरूम ड्रामापासून दमदार अॅक्शन, कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणाऱ्या कथा आणि सत्य घटनांवर आधारित भावनिक चित्रपट, क्राईम थ्रिलर अशा अनेक दर्जेदार कलाकृती या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. काय पाहावं हा प्रश्न पडला असेल, तर IMDb वरही चांगले रेटिंग मिळालेल्या या चित्रपट-वेबसीरिज नक्की पाहा. 

सिर्फ एक बंदा काफी है (Sirf Ek Bandaa Kaafi Hai)

राजस्थानमधील एका सत्य घटनेवर आधारित हा कोर्टरूम ड्रामा आहे. यात एक सामान्य वकील (मनोज बाजपेयी) आपल्या धैर्याने आणि कायद्याच्या बळावर एका भोंदू बाबाला POCSO कायद्याअंतर्गत शिक्षा मिळवून देतो. सत्यासाठी लढणारा एक माणूस संपूर्ण व्यवस्थेलाही आव्हान देऊ शकतो, हा संदेश हा चित्रपट देतो.

OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?

वेदा (Vedaa)

जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेविरोधातील संघर्षाची ही कथा आहे. दलित तरुणी ‘वेदा’ही समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवते. तिच्या या लढ्यात माजी सैन्य अधिकारी अभिमन्यू तिची साथ देतो. जॉन अब्राहम, शरवरी वाघ, अभिषेक बनर्जी अशी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा दमदार अॅक्शन, प्रभावी अभिनय आणि सामाजिक संदेश यामुळे हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?

तैश (Taish)

लंडनच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही रिव्हेंज-थ्रिलर आहे. एका लग्नसमारंभात भूतकाळातील एक धक्कादायक रहस्य समोर येते आणि त्यानंतर दोन कुटुंबांमध्ये वैर, सूड आणि रक्तरंजित संघर्ष सुरू होतो. उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.

OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?

थोडे दूर थोडे पास (Thode Door Thode Paas)

डिजिटल युगात वाढत चाललेल्या नात्यांमधील दुराव्यावर भाष्य करणारी ही कौटुंबिक वेबसीरिज आहे. एक निवृत्त अधिकारी आपल्या कुटुंबाला मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचे ‘डिजिटल डिटॉक्स’ चॅलेंज देतो. पंकज कपूर यांचा सहजसुंदर अभिनय आणि भावनिक कथा प्रत्येक कुटुंबाला विचार करायला भाग पाडते.

OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?

रिहा (Riha)

घरगुती हिंसाचारावर आधारित ही एक हृदयस्पर्शी लघुपट आहे. जोया नावाची महिला स्वतः अत्याचार सहन केलेला असतानाही दुसऱ्या पीडित महिलेला त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मदत करते. महिलांमधील परस्पर आधार, आत्मसन्मान आणि धैर्याची ही प्रभावी कथा मनाला भिडते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *