राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. महिनाभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली होती. या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला होता. परंतु अजूनही या बंडखोर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मान्यता मिळाली नव्हती. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता आमचे तेरा खासदार झाले आहेत, निश्चित आमची ताकद वाढणार आहे, आता आम्हाला या निकालाने जनतेच्या कामासाठी उभारी मिळाली, शंभर टक्के उभारी मिळेल असं यावेळी आष्टीकर यांनी म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली
शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार होते, परंतु शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केली, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची राज्यात ताकद वाढली, या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे एकूण 7 खासदार होते, परंतु या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा 13 वर पोहोचला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडे आता केवळ तीन खासदार राहीले आहेत. राज्यात आता महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदार झाले आहेत. खासदाारांच्या संख्येत शिवेसना शिंदे गटाने भाजपला देखील मागे टाकलं आहे. त्यानंतर आता या बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत परवानगी दिल्यामुळे या खासदारांची मोठी चिता मिटली आहे.