Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!


Nashik Crime News: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच आता नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये एका तरुण मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: रात्री 10:30 वाजता घडला थरार

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही मूळची जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती.

Nashik Crime News: प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

रात्रीच्या वेळी वैष्णवी सोसायटीजवळून जात असताना, एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला. त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. ती निपचित पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. वैष्णवी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. हा संपूर्ण प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, नाशिक हा कायद्याचा किल्ला आहे, असं पोलीस गुन्हेगारांकडून वदवून घेत असले तरी प्रत्यक्षात शहरातील कायदा व सुव्यवस्थेची अवस्था बिकट होत चालली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Crime News : ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं

Shaina NC WhatsApp Hacked: ‘थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा’, शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *