UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य


Mohan Yadav Statement On UCC : मध्य प्रदेशमध्ये समान नागरी कायद्याबाबत (UCC) मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी एक अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान केले आहे. “देशात सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा. जर राम एकच लग्न करणार, तर रहीम दोन, तीन किंवा चार लग्ने का करणार? जो एक लग्न करेल, त्यालाच राज्यात राहण्याचा अधिकार मिळेल,” अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपली भूमिका मांडली. कटनी येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, जेव्हा ‘एक देश, एक विधान आणि एक निशाण’ हे तत्व आपण मानतो, मग हिंदूंचा कायदा वेगळा आणि मुस्लिमांचा कायदा वेगळा का असावा? सर्वांसाठी एकच कायदा लागू झाला पाहिजे. या कायद्याला मंजुरी देण्यासाठी आगामी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

UCC Deliberations Bhopal : ऐतिहासिक जगदीशपूरमध्ये होणार कॅबिनेट बैठक

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी या कायद्याच्या मंजुरीसाठीच्या विशेष नियोजनाची माहिती दिली. भोपाळजवळ असलेल्या ‘जगदीशपूर’ या ऐतिहासिक ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची पुढील बैठक होणार आहे. या जागेचे नाव परकीय आक्रमकांनी बदलून ‘इस्लामनगर’ केले होते, जे भाजप सरकारने पुन्हा बदलून ‘जगदीशपूर’ केले आहे. याच ऐतिहासिक ठिकाणी समान नागरी कायद्याच्या (UCC) मसुद्याला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

MP Monsoon Session 2026 : आगामी मान्सून सत्रात विधेयक आणणार

सांदीपनी विद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने मध्य प्रदेश आता ‘एक देश, एक विधान, एक निशाण आणि एक कायदा’ लागू करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. विधानसभेच्या आगामी मान्सून सत्रात सर्व धर्मीयांसाठी समान नागरी संहिता (UCC) विधेयक सादर केले जाणार आहे. या सत्रापूर्वीच जगदीशपूर येथील मंत्रिमंडळ बैठकीत या मसुद्याला अंतिम मंजुरी दिली जाईल.

Ladli Behna Yojana MP : लाडली बहना योजनेबाबत मोठी घोषणा

समान नागरी कायद्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. आगामी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजना’ अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पुन्हा एकदा 1500 रुपयांची रक्कम थेट वर्ग केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेश सरकारच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता आगामी मान्सून सत्रात UCC विधेयकावरून जोरदार राजकीय घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *