विठ्ठल मूर्तीची झीज! रासायनिक लेपणास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील, आषाढी यात्रेनंतर करणार प्रक्रिया 


Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप (Pandharpur Vitthal Temple)  करण्यासंदर्भात आज जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रक्रियेवरील स्थगिती उठवली आहे . त्यामुळे आता विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपणाचा मार्ग मोकळा झाला असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आषाढी यात्रा संपल्यानंतर लगेचच ही लेपण प्रक्रिया केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे. 
   
विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीची सातत्याने होत असलेल्या झिजमुळे भारतीय पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीवर रासायनिक पद्धतीने लेपन करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय चुकीचा असून रासायनिक लेपन ऐवजी नैसर्गिक लेखन करण्याची मागणी करत काही नागरिकांनी पंढरपूर न्यायालयात दाद मागितली होती. यावर पंढरपूर न्यायालयाने या रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती देत ही प्रक्रिया थांबविली होती. याच्या विरोधात मंदिर समितीने जिल्हा न्यायालयात दादमागत रासायनिक प्रक्रिया करण्याची भूमिका मांडली होती. ही भूमिका जिल्हा न्यायालयाने मान्य करीत लेपणावर असलेली स्थगिती उठविली आहे. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आषाढी यात्रा संपल्यानंतर लगेचच लेपन प्रक्रिया होणार

दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आषाढी यात्रा संपल्यानंतर लगेचच ही लेपन प्रक्रिया केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्ती वर मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने अशा पद्धतीची लेपन प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व विभागाकडून करणे गरजेचे झाले होते. मात्र रासायनिक प्रक्रिया ऐवजी नैसर्गिक प्रक्रिया करण्यासंदर्भात काही नागरिकांनी पंढरपूर न्यायालयात याचिका दाखल केली होती. पंढरपूर न्यायालयाने या रासायनिक प्रक्रियेला स्थगिती दिल्याने विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवरील जतन आणि संवर्धनाचे काम थांबले होते. आता सोलापूर जिल्हा न्यायालयाने ही स्थगिती उठविली असून यामुळे मूर्तीवरील जतन आणि संवर्धनाचे काम करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. 
    
सध्या आषाढी यात्रा सुरू असल्याने लाखो भाविक रोज पंढरपुरात येत असून या कालावधीत ही प्रक्रिया करणे शक्य नसल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आषाढी यात्रा संपल्यानंतर तातडीने ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *