SIR In Maharashtra : एसआयआरचा फॉर्म ONLINE कसा भरायचा? 5 मिनिटात सोप्पी पद्धत समजून घ्या | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) तुम्हाला एक फॉर्म देणार आहेत, जो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून भरून सबमिट करायचा आहे.काल आपण हा फॉर्म ऑफलाईन कसा भरायचा? याची माहिती जाणून घेतली. आज आपण हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा? हे समजून घेऊयात.

how to fill sir form online
how to fill sir form online

How to fill SIR Form Online : महाराष्ट्रासह देशभरात सध्या विविध राज्यांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण (SIR) सूरू आहे. यामध्ये बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) तुम्हाला एक फॉर्म देणार आहेत, जो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून भरून सबमिट करायचा आहे.काल आपण हा फॉर्म ऑफलाईन कसा भरायचा? याची माहिती जाणून घेतली. आज आपण हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा? हे समजून घेऊयात.

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरवर जायचंय आहे आणि त्यात ECINET हा ॲप Install करायचा आहे. त्यानंतर ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील पण तुम्हाला पहिल्यांदा 2002च्या लिस्टमध्ये तुमची आई किंवा वडील यांचे नाव शोधायचे आहे. आई वडिल नसले तर नातेवाईकांची नाव शोधा. हे नाव शोधून स्किनशॉट घ्या, कारण फॉर्म भरताना तुम्हाला हा स्किनशॉट लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला ॲप मध्ये असलेल्या Voter Registration Form वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला SIR form fill Online या पर्यायावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तु्म्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा पर्याय येईल. जर तुमच या अॅपवर अकाऊंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओटीपी भरून लॉगिन करू शकता.

पण जर तुमचं अकाऊंट नसेल तर तु्म्हाला न्यू युझरवर क्लिक करावं लागणार आहे.त्यानंतर तु्म्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी भरावा लागेल, अशाप्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर Voter Registration Form वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला SIR form fill Online या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Enumeration Form कसा भरणार?

इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायच आहे आणि नंतर EPIC नंबर टाकून सबमिट करायचं आहे.सबमिट केल्यानंतर तुमची माहिती दाखवली जाईल. या माहितीमध्ये तुमच आधारकार्डवरच इंग्लीश मधलं नाव आणि आधार कार्डवरील इंग्लिशमधलं नाव दोन्ही जर सेम असेल तर तुम्हाला SIR फॉर्म ऑनलाईन भरता येईल, नाहीतर तुम्हाला भरता येणार नाही.जर समजा नावात काही चुका असतील तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरावा लागेल.

आता जर तुमचा मोबाईल नंबर वोटर आयडीशी लिंक नसेल तर खाली क्लिक हिअर हा पर्याय आहे. या पर्यायावर क्लिक करून मोबाईल लिंक करून घ्या. त्याच्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही. मोबाईल लिंक झाल्यावर तुम्हाला पुन्हा Enumeration Form वर येऊन मोबईल नंबर टाका ओटीपी आल्यानंतर तो भरा.

ओटीपी टाकल्यानंतर 4 पर्याय येतील…

जर तुमचं स्वत:च नाव 2002 च्या एसआयआर यादीत नाव असेल तर तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा आहे.जर नसेल तर तुमच्यासाठी दुसरा पर्याय आहे. जर तुमच्या आई वडिलांचे नाव एसआयआर यादीत असेल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करून त्याचं नाव शोधून पार्ट म्हणजेच सिरियल नंबर टाकून फॉर्म सबमिट करू शकता.

जर तुमचं नाव 2002 च्या एसआयआर यादीत नाही आहे.आणि तुमच्या आई वडिल नातलंगांचे देखील नाव नाही आहे. पण जर 2025-26च्या यादीत तर आई वडिलांचे नाव असेल तर तिसरा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर त्याचं नाव शोधून पार्ट म्हणजेच सिरियल नंबर टाकून फॉर्म सबमिट करू शकता. वरील प्रोसेस प्रमाणेच.

शेवटचा आणि चौथा पर्याय म्हणजे ज्या मतदार वरच्या तीनही पर्यायात बसत नाहीत.त्याच कोणत्याच एसआयआर यादीत नाव नाही आहे.त्यांनी चौथा पर्याय निवडायचा आहे. आणि आपलं संपूर्ण माहिती भरून सबमिट करू शकता.

वरीच 4 पर्यायांपैकी तुम्ही बसत असलेला पर्याय निवडून फॉर्म भरा आणि सबमिट करा.अशाप्रकारे तुमचा फॉर्म भरला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *