8 वर्षांच्या लग्नात हीच गोष्ट तुला..; निक जोनासवर प्रियांका चोप्रा नाराज, गॉसिपबद्दल म्हणाली.. – Marathi News | Nick jonas revealed best thing about eight years of marriage with priyanka chopra desi girl is not happy with the answer


बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने जवळपास आठ वर्षांपूर्वी गायक निक जोनासशी लग्न केलं. निक जोनास आणि त्याच्या भावंडांचा ‘जोनास ब्रदर्स’ म्हणून प्रसिद्ध बँड आहे. नुकतीच त्यांनी ‘हे जोनास’ नावाने एक पॉडकास्ट सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या एका एपिसोडमध्ये निक, प्रियांका, केविन जोनास आणि जो जोनास सहभागी झाले होते. यावेळी निकला विचारण्यात आलं की, प्रियांका चोप्राशी लग्न केल्यानंतर त्याला सर्वांत जास्त कोणती गोष्ट आवडत आहे? यावर निकने दिलेलं उत्तर ऐकून प्रियांकाही चकीत झाली.

निकने गंमतीने उत्तर दिलं, “प्रियांका चोप्रासोबत आठ वर्षांच्या या लग्नात मला सर्वाधिक फायदा बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिप मिळवण्यात झाला आहे. या आठ वर्षांत मला हीच गोष्ट सर्वाधिक आवडली आहे की, मला बॉलिवूडच्या अनेक गॉसिप्स ऐकायला मिळाल्या.” हे ऐकून प्रियांकाही चकीत होते आणि त्याला विचारते, “आपल्या इतक्या वर्षांच्या संसारात तुला हीच गोष्ट सर्वाधिक आवडली का? याचं संपूर्ण फीड गॉसिपने भरलेलं असतं.”

या पॉडकास्टमध्ये प्रियांकाने पुढे सांगितलं की, निकला बॉलिवूडच्या ब्रेकअप्सबद्दल तिच्याही आधी समजतं. “कोणाचं कोणाशी ब्रेकअप झालं, याची मला पुसटशीही कल्पना नसते. पण निक येऊन मला सर्वांत आधी सांगतो. अनेकदा असं होतं की, जेव्हा मी एखाद्याला मेसेज करत असते आणि समोरच्या व्यक्तीला सांगते की त्याला मी विचारलं म्हणून सांग. तेव्हा निक आधीच मला सांगतो की, त्यांचं ब्रेकअप झालं आहे. तेव्हा मला समजलं की, निक बॉलिवूडच्या गॉसिप्सवर खूप नजर ठेवतो”, असं ती पुढे म्हणाली.

पहा व्हिडीओ-

प्रियांकाची ही गोष्ट निकसुद्धा मान्य करतो. तो म्हणतो, “हो, गॉसिपकडे माझं खूप लक्ष असतं. मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही, पण ते आमचे मित्र आहेत. मी गुपचूप काही बॉलिवूड गॉसिपच्या पेजेसलाही फॉलो करतो. काही असे अकाऊंट्स आहेत, ज्यांना मी ‘घोस्ट फॉलो’ करतो. तिथे काही चांगले गॉसिप वाचायला मिळतात. अशा अनेक कथा असतात, ज्यांना फॉलो करावं लागतं.”

निक जोनास आणि प्रियांका चोप्राची पहिली भेट 2017 मध्ये ऑस्करच्या आफ्टर पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर वर्षभरातच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. 2018 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी लग्न केलं. 2022 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून निक आणि प्रियांका एका मुलीचे पालक झाले. मालती मेरी जोनास असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *