Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!


Ashadi Wari Warkari Financial Help : आषाढी वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय समोर आला आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान दुर्दैवाने एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कायदेशीर वारसाला एक लाख रुपये इतके आर्थिक साह्य देण्याची घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यास सहभागी झालेल्या धाराशिवमधील मीनाबाई सत्यवान सूर्यवंशी (वय 55 वर्षे) यांचा शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता हृदयविकाराने निधन झालं. बेलवाडी या ठिकाणी रिंगण सोहळ्यादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यानंतर देहू संस्थानाने वारकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. 

पालखी सोहळ्यात दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने आणि माउलींच्या विठू नामाच्या गजरात सहभागी होतात. या लांबच्या पायी प्रवासात अनेकदा तीव्र ऊन, पाऊस किंवा अपघाती कारणांमुळे अनुचित घटना घडून काही वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशा कठीण प्रसंगी गरीब वारकरी कुटुंबाला संकटकाळात आधार मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थानने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Palkhi Sohla Help Terms Conditions : मदत मिळवण्यासाठी ‘या’ अटी बंधनकारक

श्री संत तुकाराम महाराज संस्थानने स्पष्ट केले आहे की, हे आर्थिक साह्य थेट मृत वारकऱ्याच्या कायदेशीर वारसाला दिले जाईल. मात्र, सदर आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी संस्थानकडून काही नियमांची आणि अटींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Warkari Death Help Documents : ही कागदपत्रे सादर करावी लागणार

संस्थानकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी खालील पुरावे आणि कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील:

  • संबंधित वारकऱ्याच्या मृत्यूची अधिकृत शासकीय नोंद असणे आवश्यक आहे.
  • मृत व्यक्ती पालखी सोहळ्यातील दिंडीत सहभागी असल्याचा ठोस पुरावा द्यावा लागेल.
  • मदत मिळवण्यासाठी कायदेशीर वारस असल्याचा वैध दाखला जोडणे बंधनकारक असेल.
  • याव्यतिरिक्त संस्थेने वेळोवेळी मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

Dehu Sansthan Social Commitment : पडताळणीनंतर मिळणार रक्कम

संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, वारसांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांची प्रशासकीय पातळीवर पूर्ण पडताळणी केली जाईल. सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार ठरलेली 1 लाख रुपयांची आर्थिक मदत कायदेशीर वारसाच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. वारीच्या काळात वारकरी कुटुंबांना मानसिक सोबतीसोबतच आता आर्थिक सुरक्षा देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *