Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर अखेर आमिरने सोडलं मौन; म्हणाला “त्यांनी स्वत:च..” – Marathi News | Aamir khan breaks silence over sonam wangchuk hunger strike here is what he said


प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचूक सध्या दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी उपोषणाला बसले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते उपोषण करत आहेत. गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचूक यांनी अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. देशातल्या अनेक सेलिब्रिटींनी आणि सर्वसामान्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी आपलं उपोषण संपवावं अशी त्या सर्वांची इच्छा आहे. या उपोषणापेक्षा सोनम वांगचूक यांची प्रकृती अधिक महत्त्वाची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. यादरम्यान ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाचा स्टार होमी वैद्यचाही एक व्हिडीओ समोर आला होता. मात्र आमिर खान अद्याप मौन बाळगून का आहे, यावरून नेटकरी ट्रोल करत होते.

‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील आमिर खानचं ‘रँचो’ हे पात्र सोनम वांगचूक यांच्यावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. आता आमिरने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नुकतीच त्याने ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. तिथे त्याला सोनम वांगचूक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

‘3 इडियट्स’मधील रँचोची भूमिका

‘थ्री इडियट्स’ची कथा सोनम वांगचूक यांच्यावर आधारित आहे का, या प्रश्नावर आमिर खान म्हणाला, “नाही, हे खरं नाही. खरं तर हा एक गैरसमज आहे. जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचूक यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी अलीकडेच चतुरचा (होमी वैद्य) एक व्हिडीओ पाहिला, ज्यात तो असं म्हणाला होता. पण नाही, तो चुकीचा आहे. चतुरला कदाचित तसं वाटलं असेल, पण मला हे स्पष्ट करायचं आहे की, त्यावेळी ना राजकुमार हिरानी, ना अभिजात जोशी (ज्यांनी थ्री इडियट्सची कथा लिहिली), ना मी, आम्हांपैकी कोणालाही सोनम वांगचूक यांच्याबद्दल माहीत नव्हतं.”

सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया

यावेळी आमिरने त्यांच्या उपोषणावरही प्रतिक्रिया दिली. तो पुढे म्हणाला, “सोनम वांगचूक जे काम करत आहेत, ते उत्कृष्ट आणि कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी ‘थ्री इडियट्स’मधील एखादं पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. सोनम वांगचूक यांनी स्वत:च यापूर्वी स्पष्ट केलं आहे की या चित्रपटातील पात्र त्यांच्यावर आधारित नव्हतं. अचूक माहिती देण्यासाठीच मला हे स्पष्ट करायचं होतं. आम्हा सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची आणि जिवाची काळजी आहे. सर्व काही सुरळीत पार पडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांनी उपोषण सोडावं आणि आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी, अशी आमची इच्छा आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *