Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडून येत युतीचे नरेंद्र दराडे यांना स्वीकारावा लागला पराभव. महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्याने गोकुळ गीते यांनी थेट युतीच्या उमेदवाराविरोधात पुकारले होते बंड. बहुमत असूनही नरेंद्र दराडे यांचा विधान परिषद निवडणुकीत झालाय दारुण पराभव. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्ष शिस्त तोडणाऱ्या नगरसेवकांचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला प्रदेश कार्यकारिणीकडे.
महायुतीच्या विरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार – सुनील केदार शहराध्यक्ष भाजप. नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ असलेल्या उमेदवाराचा पराभव होतो हा इतिहास मात्र यंदाही घोडेबाजार झाल्याने दराडे यांचा पराभव झाल्याची भाजप शहराध्यक्ष केदार यांची कबुली. दराडे यांच्या विरोधात नाराजी होती मात्र उमेदवार कोणीही असो तो युतीचा होता त्यामुळे कारवाई होणार असल्याचा केदार यांनी दिला इशारा. भाजप हा शिस्तीचा पक्ष त्यामुळे पक्षादेश न पाळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच, असे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.