Last Updated:
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये इंग्लंडचा 4 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत इंग्लंडने 3 वनडे मॅचच्य या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे.
कार्डिफ : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये इंग्लंडचा 4 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत इंग्लंडने 3 वनडे मॅचच्य या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे. भारताने दिलेलं 234 रनचं आव्हान इंग्लंडने 44.1 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडची अवस्था सुरूवातीलाच खराब झाली. इनिंगच्या पहिल्याच बॉलला जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर बेन डकेट शून्य रनवर आऊट झाला, तर इंग्लंडचा दुसरा ओपनर जेकब बेथलही 4 रन करून माघारी परतला. 8 रनवरच दोन विकेट गेल्यानंतर इंग्लंड संकटात सापडली, पण जो रूटने इंग्लंडच्या इतर खेळाडूंना घेऊन किल्ला लढवला.
रूटसोबत 99 रनवर धोका
जो रूट 99 रनवर नाबाद राहिला, तर विल जॅक्सने 30, सॅम करनने 26, जॉस बटलरने 17 आणि कर्णधार हॅरी ब्रुकने 16 रनची खेळी केली. गस एटकिनसन 23 रनवर नाबाद राहिला, पण इंग्लंडच्या विजयानंतरही एटकिनसन व्हिलन ठरला. इंग्लंडला विजयासाठी 4 रनची गरज असताना 45व्या ओव्हरचा पहिला बॉल प्रसिद्ध कृष्णाने वाईड टाकला, यानंतर इंग्लंडला आणखी 3 रनची गरज होती आणि रूटला शतकासाठी आणखी एक रन हवी होती, पण गस ऍटकिसनने प्रसिद्ध कृष्णाला फोर मारून इंग्लंडला विजय मिळवून दिला. गस ऍटकिनसनने एक रन काढून रूटला स्ट्राईक दिला असता तर त्याला शतक पूर्ण करता आलं असतं.
Mumbai,Maharashtra
