जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?


मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची  त्यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. या भेटीमुळं राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते.  फक्त जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड झाली चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरु असतानाच जयंत पाटील यानी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

जयंत पाटील आणि एकनाथ शिंद यांच्यात बंददाराआड नेमकी काय चर्चा झाली

दरम्यान, जयंत पाटील आणि एकनाथ शिंद यांच्यात बंददाराआड नेमकी काय चर्चा झाली, याबाबत देखील तर्क वितर्क लढवले जात आहेत. जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते. फक्त जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड झाली चर्चा झाली आहे. दोनच दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हेदेखील होते वर्षावर निवासस्थानी उपस्थित होते. अशातच आज जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. 

शरद पवार राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील झाल्यास अर्थखात जयंत पाटील यांना मिळणार?

दरम्यान, अधिवेशनाच्या काळात शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शरद पवार राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील झाल्यास अर्थखात जयंत पाटील यांना अर्थ मंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. तिन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, जयंत पाटील अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता नंदनवन निवासस्थानी नेमकी काय चर्चा सुरु झाली. याबाबत सुत्रांनी माहिती दिली आहे. मागील दोन दिवसांच्या आतच जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *