शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले.. – Marathi News | MP Supriya Sule has commented on whether Sharad Pawar will join the NDA


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीओसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. ज्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. शरद पवार एनडीएमध्ये जाणार म्हटल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला. यासोबतच डीलिमिटेशन बिलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएसोबत आहे, असेही सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला तर त्यांना थेट अर्थमंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, अजित पवारांचा गट अर्थमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. त्यामध्येच काल रात्री वर्षा बंगल्यावर जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. ज्यामुळे शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली. यावर आता सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आज सकाळपासून एका वर्तमानपत्रात आणि प्रसारमाध्यमात काही गोष्टी आल्या आहेत. अधिकृतपणे आमच्या पक्षाने कोणत्याही चॅनलशी काहीही भाष्य केलं नाही. पक्षाबद्दल, पक्षाच्या धोरणाबद्दल जी काही भूमिका मीडियात आली, ती सूत्रांच्या माध्यमातून आली आहे. आम्ही कोणतंही स्टेटमेंट दिलं नाही.

फिजिकली, ऑफिशियली स्टेटमेंट दिलं नाही. गैरसमज आहे. म्हणून भूमिका मांडत आहे. आमचे सहकारी, पदाधिकारी आणि आघाडीत कोणताही गैरसमज असू नये म्हणून मी ही भूमिका मांडत आहे. मी जे सांगेल ऑन कॅमेरा तेच सत्य आणि वास्तव आहे. सूत्रांची माहिती, हा बोलला तो बोलला, चहा पिताना बोलला याला काही अर्थ नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट एनडीएसोबत जाणार नाही.

आम्हाला एनडीएने कोणताही प्रस्ताव दिला नाही, आम्ही कुठेही जात नाही. जिथे आहोत, तिथेच काम करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनमध्ये जाण्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. शरद पवार यांना जास्त चालायचे नसल्याने ते तिथे जाऊन बसले. एकनाथ शिंदे यांच्या मनाचा मोठेपणा की ते कॅबिनेट बैठक सोडून आले आणि त्यांनी शरद पवार यांना बुके दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *