मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू


मुंबई : मध्य रेल्वेच्या पथकाने दिनांक १४.०७.२०२६ रोजी कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या दक्षिण-पूर्व ‘डाऊन’ मार्गिकेची यशस्वीरित्या पुनर्स्थापना केली आहे. ‘डाऊन’ मार्गिकेवरून ३ मालगाड्यांच्या यशस्वी परिचालनानंतर, गाडी क्रमांक 22107 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर एक्सप्रेस या मार्गावरून धावणारी पहिली प्रवासी गाडी ठरली. ही गाडी दिनांक १४.०७.२०२६ रोजी २३:१८ वाजता कर्जत येथून निघाली, ताशी २० किमी वेगाने हा विभाग पार केला आणि दिनांक १५.०७.२०२६ रोजी ००:२७ वाजता लोणावळा येथे पोहोचली.

गाडी क्रमांक 12123/12124 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन आणि 
गाडी क्रमांक 12127/12128 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा दिनांक १६.०७.२०२६ पासून पूर्ववत केली जाईल.

दिनांक ०६.०७.२०२६ रोजी झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर लोणावळा – कर्जत विभागातील सेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे पथक गेल्या १० दिवसांपासून अहोरात्र काम करत आहे. मध्य मार्गिका दिनांक ०७.०७.२०२६ रोजी, तर ‘डाऊन’ मार्गिका दिनांक १४.०७.२०२६ रोजी पूर्ववत करण्यात आली असून, ‘अप’ मार्गिका पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक आणि १२०० हून अधिक कामगारांचा समावेश असलेले मध्य रेल्वेचे पथक, कठीण भौगोलिक परिस्थितीत आणि आव्हानात्मक वातावरणात २४x७ काम करत आहे. ढिगारा हटवणे, तिसरा ट्रॅक पूर्ववत करणे आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर सामान्य करणे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

ढिगारा हटवण्याचे काम जलदगतीने करण्यासाठी घटनास्थळी ‘बोल्डर स्पेशल ट्रेन’, युनिमॅट मशीन, ड्युओमॅटिक मशीन, पोकलेन मशीन्स आणि जेसीबी यांसारखी अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य त्या प्रमाणात ‘कामगारांसाठी विशेष गाड्या’ देखील चालवल्या जात आहेत. गाड्यांच्या चालविण्याबाबत माहितीसाठी, प्रवासी रेल्वेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप पाहू शकतात.
प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी अद्यतने दिली जात आहेत.

हे आव्हान पेलताना प्रवाशांनी दाखवलेल्या समंजसपणाबद्दल आणि सहकार्याबद्दल मध्य रेल्वे कृतज्ञता व्यक्त करते; तसेच, यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करते.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *