Last Updated:
फिफा वर्ल्ड कप 2026 आता आपल्या अंतिम टप्प्याकडे वळत आहे. आज सेमीफायनलचा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिनामध्ये होणार आहे. पण, त्याआधीच अर्जेंटिनाविरोधात वाद पेटला आहे.
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप 2026 आता आपल्या अंतिम टप्प्याकडे वळत आहे. आज सेमीफायनलचा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिनामध्ये होणार आहे. पण, त्याआधीच अर्जेंटिनाविरोधात वाद पेटला आहे. अर्जेंटिना आणि लिओनेल मेसीविरोधात 70 लाख लोकांनी एक ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये अर्जेटिना टीमला बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे.
अर्जेंटिना टीमने उपांत्य पूर्वी सामान्यामध्ये स्विझरलँडला हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारली. पण, राउंड ऑफ 16 मध्ये इजिप्तच्या विरोधात रोमांचक विजय मिळवला. पण, रेफरीने घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला. कारण, दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी बॉक्समध्ये फाउल असतानाही मोहम्मद सालाहला पेनल्टी दिली नाही.
आता अर्जेंटीनाआउट डॉट कॉम वेबसाईट कडून ही मोहीम राबवली जात आहे. फिफा आणि रेफरी या दोघांनी मेस्सी आणि अर्जेंटिना टीमच्या बाजूने निकाल दिला. जर फिफाने हे ठरवलं असेल की, अर्जेंटिना टीमच जिंकणार आहे, तर मग बाकी देशातील टीमने काय करावं? त्यामुळे अर्जेंटिना टीमला बाहेर काढून निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे.
तर दुसरीकडे इजिप्त फुटबॉल असोसियशन (EFA) ने अर्जेंटिनाकडून 3-2 ने पराभव स्वीकारल्यानंतर रेफरी फ्रँकोइस लेटेक्सियर आणि त्यांच्या टीमविरोधात चौकशीची मागणी केली होती, याबद्दल तशी फिफा अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली होती. EFA चे अध्यक्ष हानी अबुरिदा यांनी या प्रकरणी रेफरीविरोधात आरोप केले होते.
अर्जेंटिना आणि इंग्लंडमध्ये आज सेमीफायनल मुकाबला
दरम्यान, आज अर्जेटिना आणि इंग्लंडमध्ये आज सेमीफायनलचा सामना होणार आहे. दोन्ही टीमध्ये याआधीही अटीतटीची लढत झाली होती. 2002 नंतर पहिल्यांदाच दोन्ही टीम आमनेसामने येत आहे. अर्जेंटिना टीम खूप चतूर आहे आणि टेक्निकल खेळ करते. त्यांना माहितीये की फाऊल कुठे आणि कसा मिळेल, असा दावा इंग्लंड टीमचा कॅप्टन हैरी केनने केला आहे.
Mumbai,Maharashtra
