पक्ष सोडण्याचा नवा पॅटर्न… बायकोला ईडीची नोटीस येताच नवऱ्याने पक्ष सोडला; सर्वच पदांचा दिला राजीनामा – Marathi News | ED Notice Trigger: Madan Mitra Quits TMC After Wifes Summon, Sparks New Defection Trend


सध्या ईडीची नोटीस किंवा पोलिसी कारवाईच्या धाकाने राजकीय नेत्यांकडून पक्ष सोडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेक नेते कोलांटउडी घेताना दिसत आहेत. अगदी पक्षात सुरुवातीपासून काम करणारे, नेतृत्वाच्या पाठी खंबीरपणे उभे असणारे नेतेही पक्ष सोडताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी मदन मित्रा यांनी पक्ष सोडला आहे. त्याला कारणही अजब आहे. मित्रा यांनी ज्या कारणाने पक्ष सोडला त्याची पश्चिम बंगालमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

मदन मित्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ऋतब्रत बनर्जी यांच्या नेतृत्वातील टीएमसी ज्वॉईन केली आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोडली होती, तेव्हापासून मित्रा हे ममता बॅनर्जींसोबत होते. ममता दीदींचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनीच पक्ष सोडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मित्रा हे पश्चिम बंगालच्या कामरहाटी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांनी ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या राष्ट्रीय आणि राज्य समित्यांचे राजीनामे दिले आहेत.

रूम बदलली, खोली नाही

सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर मदन मित्रा यांनी मीडियाशी संवाद साधला. मी आता माझी रूम बदलली आहे. खोली नाही. मी अजून टीएमसीचाच भाग आहे, असं मदन मित्रा यांनी म्हटलं आहे. मी अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून सहा महिने किंवा एक वर्षासाठी बाहेर पडावे असा सल्ला दिला होता. आम्ही पक्ष मजबूत करू. त्यानंतर तुम्ही या आणि परत तुमचं पद घ्या. पण त्यांनी नकार दिला, असं मित्रा म्हणाले.

सर्व मेले तरी चालतील…

मी पार्टी सोडणार नाही. पक्ष बुडत चालला आहे, तरीही पक्षाने त्यांना स्वीकारलं. असं समजा ही पक्षाची मजबुरी होती. सर्व मेले तरी चालेल पण अभिषेकला वाचवणं आवश्यक होतं. हे अत्यंत दुखद आहे, असा टोमणाही मित्रा यांनी लगावला.

प्रत्येक गोष्ट सोडलीय

पक्ष सर्वांचा आहे. पण आता असं वाटतंय की फक्त अभिषेकच्या सेवेसाठीच पक्ष जुंपला गेला आहे. मी ममतादीदींना सांगू इच्छितो की ही गोष्ट एक मॅरेथॉन म्हणून पाहा. रस्त्यात आपण भेटूच. बघू कोणता घोडा पुढे जातो. मी सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. अर्थात मी आमदार म्हणून कायम राहील. मी तृणमूलशी संबंधित प्रत्येक गोष्ट सोडली आहे. याचा अर्थ मी व्यावहारिकपणे मी तृणमूलचा आमदार राहिलेलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ईडीची नोटीस

दरम्यान, मदन मित्रा यांची पत्नी अर्चना मित्रा आणि दोन मुलांना ईडीने नोटीस बजावली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. नगरपालिकेतील नियुक्ती घोटाळ्यात 250 कोटींची अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे मित्रा यांच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने मित्रा यांच्या घरासहीत कोलकाता आणि आसपासच्या सात ठिकाण्यांवर रोड मारली आहे. गेल्यावर्षीही मित्रा यांच्या घरी सीबीआयने रेड मारली होती. त्यावेळी पाच तास चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने समन्स बजावताच मित्रा यांनी दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *