CRIME : लग्नाला 2 महिनेही झाले नव्हते, 22 वर्षाच्या तरुणीने मृत्यूने कवटाळलं! 28 पानांची नोट वाचून पोलिसांचाही उडाला थरकाप | क्राइम बातम्या


Last Updated:

Dowry Harassment 22 Year Old Newlywed Ends Life : सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी परतली होती आणि तिने कुटुंबियांना हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली. तरी देखील माहेरच्या लोकांनी मध्यस्तींच्या माध्यमातून वाद मिटवला.

Dowry Harassment 22 Year Old Newlywed Ends Life
Dowry Harassment 22 Year Old Newlywed Ends Life

Newlywed Ends Life Dowry Harassment : आजच्या 21 व्या शतकात आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारत असलो, तरी हुंड्यापाई हजारो निष्पाप तरुणींचा छळ केला जातो आणि शेवटी त्यांचे आयुष्य संपवलं जातं. महाराष्ट्रातून देखील अशा अनेक घटना समोर येत असतात. अशातच आता सामाजिक विकृती इतर राज्यामध्ये देखील प्रखरतेने दिसते. त्यातच आता उत्तर प्रदेशमधून मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. एका 22 वर्षाच्या तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी या तरुणीने तब्बल 28 पानांची सुसाईड नोट लिहिली.

चौथ्याच दिवशी पळून माहेरी परत आली…

शिफली केसरवानी असं आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचं नाव असून दोन महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं होतं. प्रयागराज येथील रहिवासी गोपाळ केसरी याच्याशी झाला अन् लग्नानंतर चौथ्याच दिवशी ती पळून माहेरी परत आली होती. सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी परतली होती आणि तिने कुटुंबियांना हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली. तरी देखील माहेरच्या लोकांनी मध्यस्तींच्या माध्यमातून वाद मिटवला अन् तरूणीला पुन्हा सासरी पाठवलं. त्यानंतर महिन्याभराने ती पुन्हा माहेरी आली अन् तिने नवऱ्याची विकृती सगळ्यांना सांगितली.

नवरा दारूच्या नशेत बेदम मारायचा

तरुणीने माहेरी आल्यावर सगळी घटना सांगितली. तिचा नवरा तिला दररोज दारूच्या नशेत तिला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करायचा. गुटखा खावून अंगावर थुंकायचा. तसेच तिला तिचा दीर दररोज शिव्या देखील देत असयचा. तर सासरची लोक तिला जेवण देखील देत नव्हती. माहेरच्यांनी हे सगळं ऐकल्यावर मुलीला इथंच ठेवण्याचा निर्णय घेतला. पण सासरच्यांकडून आग्रह अन् खोट्या विणव्या ऐकून तरुणीला घेऊन जाण्यासाठी सासरची मंडळी येणार होती.

28 पानांची सुसाईड नोट लिहिली

सासरी जाऊन पुन्हा नरक यातना सोसाव्या लागतील, याची कल्पना शिफलीला होती. त्यामुळे तिने आयुष्यातून मुक्त होण्याचा मार्ग निवडला अन् गळफास लावून स्वत:ला संपवलं. त्याआधी तिने 28 पानांची सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांनी ही नोट ताब्यात घेतली अन् तरुणीचा पती, सासू, सासरे आणि दीर अशा चार जणांविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या/क्राइम/

CRIME : लग्नाला 2 महिनेही झाले नव्हते, 22 वर्षाच्या तरुणीने मृत्यूने कवटाळलं! 28 पानांची नोट वाचून पोलिसांचाही उडाला थरकाप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *