Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले…


Tukaram Mundhe News: सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम (FDA Maharashtra) राबवत आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. याचदरम्यान, तुकाराम मुंढेंनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा काही बाहेरचं फूड खातात का?, किंवा ते कुठे खातात, असा प्रश्न तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. या प्रश्नवर देखील त्यांनी थेट उत्तर दिलं. (Tukaram Mundhe)

तुमचं आवडतं खाणं काय, तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा काही बाहेरचं फूड खातात का?, किंवा ते कुठे खातात, असा प्रश्न तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. यावर मी क्वचित कधीतरी बाहेरचं फूड खातो. खातचं नाही असं नाही. मला बाहेरचं फूड आवडत नाही. मला घरचं फूड आवडतं. मी हॉटेलमध्ये जेवत नाही. अन्न शरीरासाठी खायचं की चवीसाठी खायचं, हे आपल्यावर अवलंबून असतं, असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं. (Tukaram Mundhe Marathi News)

मी माझ्या मुलांनाही रस्त्यांवरचं फूड खायला देत नाही- तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe On Food)

मी माझ्या मुलांनाही रस्त्यांवरचं फूड खायला देत नाही. मीही कधी खात नाही, असंही तुकाराम मुंढे म्हणाले. रस्त्यावरील फूड देखील चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. रस्त्यावरील फूड चांगलं नसतं, असं मी म्हणत नाही. परंतु त्यांनी नियम पाळले पाहिजेत. चांगलं फूड ठेवलं पाहिजे. रस्त्यावरील फूड सुरक्षित आणि प्रमाणित असायला हवं. आपण खातोय, ते चांगला आणि योग्य आहे का बघा, असं आवाहनही तुकाराम मुंढेंनी केलं.

तुम्हाला कधीच भीती वाटत नाही का? (Tukaram Mundhe News)

तुम्ही संपूर्ण यंत्रणेला धारेवर घेता. बेधडक तुकाराम मुंढे आम्ही पाहतो. मग ते कोणताही विभाग असो…तुम्हाला कधीच भीती वाटत नाही का?, असा प्रश्नही तुकाराम मुंढेंना विचारण्यात आला. यावर भीता अशी नाही. बेधडक म्हणजे मी सिस्टिमॅटिक असतो. मी हे बघतो, की आपली भूमिका काय आहे आणि मी ती पाळतो की नाही. मी माझी भूमिका 100 टक्के यशस्वी पाळण्याचा प्रयत्न करतो. मग ती पुढे यशस्वी होते की नाही, हा पुढचा भाग असतो, मात्र प्रयत्न नक्कीच करतो, असं तुकाराम मुंढे म्हणाले. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही…; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!

Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *