‘धुरंधर’च्या यशानंतर पहिल्यांदाच लग्नात दिसला अक्षय खन्ना; शेकडो VIP पाहुण्यांमध्ये त्याचाच फोटो सर्वाधिक व्हायरल – Marathi News | Akshaye khanna makes first public appearance after dhurandhar success in anshula wedding hugs boney kapoor see pic


बोनी कपूर, अक्षय खन्नाImage Credit source: Instagram

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर त्यातील अनेक छोटे-मोठे कलाकार विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समोर आले. अनेकांनी त्यांच्या भूमिकांबद्दल विविध मुलाखतीसुद्धा दिल्या, मात्र रेहमान डकैतची भूमिका साकारलेला अभिनेता अक्षय खन्ना या यशादरम्यान कुठेच दिसला नव्हता. अक्षय खन्ना हा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो कधीच कोणत्या पार्ट्यांमध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहसा दिसत नाही. मात्र सध्या त्याचा असा एक फोटो समोर आला आहे, जे पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. ‘धुरंधर’च्या यशानंतर पहिल्यांदाच अक्षय एका कार्यक्रमात पोहोचला आहे. निर्माते बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होता.

बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूरने बॉयफ्रेंड रोहन ठक्करशी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा लग्नसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला असून त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान सर्वाधिक चर्चा ही अक्षय खन्नाच्याच उपस्थितीची होत आहे. बोनी कपूर यांनी स्वत: लेकीच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या कुटुंबीयांशिवाय बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटीसुद्धा दिसत आहेत. सर्वांत विशेष बाब म्हणजे, ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्ना अशा पद्धतीने पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसला आहे.

पहा फोटो-

‘धुरंधर’ प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी अक्षय त्याच्या नव्या घरात पूजा करतानाही दिसला होता. मात्र तो कायम लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करतो. चित्रपटातील त्याची रेहमान डकैतची भूमिका आणि त्याने केलेला डान्स प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यावरून अनेकांनी रील्स बनवले होते आणि अक्षयच्या स्क्रीन प्रेझेन्सचं तोंडभरून कौतुक केलं होतं. इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही तो मीडिया आणि चर्चांपासून दूरच राहिला. मात्र आता त्याला लग्नसोहळ्यात पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. या फोटोमध्ये अक्षय खन्ना बोनी कपूर यांना मिठी मारताना दिसत आहे.

अक्षय खन्नाचा फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिलं, ‘अक्षयचा फोटो शेअर करण्यासाठी धन्यवाद, आमचा तर दिवसच खास झाला.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘त्याच्या चेहऱ्यावरील हे हास्य कायम तसंच राहू दे. या संपूर्ण लग्नसोहळ्यात सर्वांत खास फोटो अक्षय खन्नाचाच आहे.’





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *