IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला


बर्मिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला आणि 258 धावा केल्या. भारताला विजयासाठी 259 धावांची आवश्यकता आहे. भारताची टी 20 मालिकेत खराब कामगिरी झाल्यानं देशातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीकडे लागले होते. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठी धावसंख्या उभारु न शकल्यानं कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली.  

रोहित विराटकडून निराशा

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मानं  21 बॉलमध्ये 11 धावा केल्या. यामध्ये त्यानं एक चौकार मारला.  रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, विराट कोहली 6 बॉलमध्ये 5 धावा करुन बाद झाला. विराट कोहली देखील केवळ एक चौकार मारु शकला.  

इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 47.5 ओव्हरमध्ये 258 धावा केल्या. यानंतर भारताला धावसंख्येचा पाठलाग करायचा असल्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगली फलंदाजी करतील अशी आशा चाहत्यांना होती.  रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी डाव सावरला. शुभमन गिल 80 धावांची खेळीकरुन दुखापतीमुळं मैदानाबाहेर गेला. श्रेयस अय्यर 35 धावा करुन बाद झाला.   

जो रुटनं इंग्लंडचा डाव सावरला

इंग्लडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी 61 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडची अवस्था 5 बाद 80 अशी होती. इंग्लंडची सहावी विकेट 107 धावांवर पडली. यानंतर जो रुट आणि लियाम डॉसम यांनी  7 व्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली.  यानंतर इंग्लंडची सातवी विकेट 228 धावांवर पडली यानंतर त्यांचा डाव 258 धावांवर आटोपला. भारतासाठी सर्वाधिक विकेट अक्षर पटेलनं घेतल्या. अक्षर पटेलनं इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं. गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा यांनी दोन दोन विकेट घेतल्या. तर, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहनं एक एक विकेट घेतली. 

 टीम इंडियाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग आणि आदिल रशीद.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *