Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं


पुणे : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई सुरू केली आहे. सकाळपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी (Pune ATS Raid) धाडसत्र राबवण्यात आले.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून (Pune ATS Raid) पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या एकूण ६६ जणांवर ATS ची नजर होती. त्यापैकी आतापर्यंत ४५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Pune ATS Raid)

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शहजाद भट्टी किंवा त्याच्याशी संबंधित खात्यांशी चॅटिंग आणि संपर्क साधल्याचा संशय आहे. या संपर्काचे स्वरूप, उद्देश आणि त्यामागील संभाव्य नेटवर्क याची पडताळणी करण्यासाठी ATS कडून ही व्यापक कारवाई करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची ATS अधिकारी कसून चौकशी करत असून, त्यांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, डिजिटल उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासले जात आहेत. चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, या व्यक्तींचा संपर्क केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता की त्यापुढेही काही संबंध होते, याचा तपास सुरू आहे.(Pune ATS Raid)

दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ATS किंवा पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींविरुद्ध कोणते गुन्हे नोंदवले जाणार किंवा पुढील कायदेशीर कारवाई काय होणार, याबाबत अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shahzad Bhatti :  पैशाचे आमिष दाखवून नेटवर्कचा विस्तार करण्याचे प्रयत्न

बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तरुणांना सहज कमाई आणि अधिक पैशांचे आमिष दाखवून या नेटवर्कमध्ये ओढले जात असल्याचा संशय आहे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, या व्यक्तींना स्लीपर सेल आणि स्थानिक एजंट म्हणून तयार करण्याची योजना असू शकते. गुप्त माहिती गोळा करणे, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्रपुरवठा यांसारख्या गंभीर प्रकरणांचाही तपास सुरू आहे.

Shahzad Bhatti : कोण आहे पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी?

शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, दुबईतून डोगर गँग आणि इतर टोळ्यांशी संबंधित नेटवर्क चालवतो. तो सोशल मीडियावर भारतीय तरुणांना सहज ओढून कट्टरतावादी विचारसरणी आणि हेरगिरीकडे नेतो. गेल्या काही महिन्यांत भारतातील दहशतवादी भरती आणि गुप्तहेर प्रकरणांमध्ये त्याचं नाव वारंवार समोर आलं आहे. महाराष्ट्रातही काही तरुण त्याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने हे नेटवर्क तोडण्यासाठी मोठी कारवाई केली. शहजाद भट्टीच्या उलटगणती आता सुरू झाली असून, त्याला भारतात पकडण्यासाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत.

पाकिस्तानस्थित सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व शहजाद भट्टी हा दहशतवादाशी संबंधित कारवाया आणि कट्टरतावादी नेटवर्कशी कथित संबंधांमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे. एकेकाळी ऑनलाइन कॉन्टेन्ट (content) निर्मितीच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भट्टीवर आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून असुरक्षित तरुणांची भरती करण्याचा आणि त्यांना गुन्हेगारी व अतिरेकी नेटवर्कशी जोडण्याचा आरोप आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *