महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडलं! मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तटकरे-पटेल पोहोचले अन् जयंत पाटलांची एंट्री | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

राष्ट्रवादीतील घडामोडींना नवीन वळण मिळालं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले.

News18
News18

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मध्यंतरी मतभेदाच्या नाट्यानंतर आता नवीन अंकाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट होत नाही तेच शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. एकापाठोपाठ दोन्ही गटाच्या प्रमुख शिलेदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नाव कार्यकारिणीमधून वगळण्यात आली होती. हा वाद शमत नाही तेच आता  राष्ट्रवादीतील घडामोडींना नवीन वळण मिळालं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पण, चर्चेचा तपशील हा गुलदस्त्यातच आहे.  भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जयंत पाटील पोहोचले ‘वर्षा’वर

दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे वर्षा बंगल्यावर असतानाच अचानक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली.  प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यानंतर जयंत पाटील वर्षावर पोहोचले आणि  तिन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे.  जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर नेमकं कशासाठी आले आणि तेही तटकरे आणि पटेल असताना, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडलं! मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तटकरे-पटेल पोहोचले अन् जयंत पाटलांची एंट्री



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *