Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द


मुंबई : आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अशा तीन हॉटेल्सचे अन्न परवाने (Food Licenses) निलंबित करण्यात आले आहेत. भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील या हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

FDA Action On Iconic Hotels Mumbai : ‘या’ तीन नामांकित हॉटेल्सवर कारवाईची कुऱ्हाड

एफडीएने केलेल्या या धडक कारवाईत मुंबईतील खालील तीन मोठ्या हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत:

– शालिमार हॉस्पिटॅलिटी (Shalimar Hospitality)

– नूर मोहम्मदी हॉटेल (Noor Mohammadi Hotel)

– रहमानिया रेस्टॉरंट (Rahmaniya Restaurant)

FDA Action On Mumbai Hotels : हॉटेल्समध्ये आढळल्या गंभीर त्रुटी

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेल्सची अचानक तपासणी केली असता, तिथे स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणीदरम्यान खालील धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या:

– हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात (Kitchen) प्रचंड अस्वच्छता आढळून आली, तसेच तिथे कीटकांचा वावर असल्याचेही स्पष्ट झाले.

– ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही तपासणी केली नसल्याचे समोर आले.

– हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या (Raw Material) खरेदीच्या नोंदी आणि वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या (Edible Oil Quality) नोंदी ठेवल्या गेल्या नव्हत्या.

या सर्व त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे स्पष्ट करत एफडीएने थेट निलंबनाची कारवाई केली.

FDA Raid On Amravati Darbar : ‘अमरावती दरबार’ बंद करण्याचे आदेश

मुंबईव्यतिरिक्त एफडीएने आपला मोर्चा विदर्भाकडेही वळवला आहे. अमरावती येथील प्रसिद्ध ‘अमरावती दरबार’ (Amravati Darbar) या हॉटेलला कोणतीही वैध अन्न परवाना (Valid Food License) नसताना व्यवसाय चालवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. वैध परवाना मिळेपर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत.

ही बातमी वाचा: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *