Moana Film Review: बेटावर राहणारी ‘Moana’ दैवी शक्तीच्या शोधात समुद्रात उतरते, वडिलांचा नकार तरीही… ‘मोआना’ सिनेमा आहे तरी कसा?



Moana Film Review: केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्येही ‘रिमेक’चा (Film Review) फिव्हर आहे. 2016 साली Moana हा (Moana Remake)  अॅनिमेटेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  याच सिनेमाचा रिमेक आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यावेळी Moana या सिनेमात अॅनिमेशनऐवजी खरी पात्र भूमिका साकारत आहे.  तब्बल 10 वर्षांनंतर या सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण या सिनेमाचा रिमेक पाहताच, हा चित्रपट बनवण्याची गरज नव्हती, कारण हा सिनेमा 2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘Moana’सारखाच आहे. जर आपण 2016 साली रिलीज झालेला ‘Moana’ पाहिला असेल तर, आपल्याला रिमेक अनावश्यक वाटेल. तसेच हा सिनेमा मुळात बनवला का? असाही प्रश्न मनात येईल.

‘Moana’ या सिनेमाच्या कथेत नेमकं आहे तरी काय? (Moana 2026 Film Reveiw)

या सिनेमाच्या कथेत ‘Moana’ नावाची मुलगी दाखवण्यात आली आहे. जी मोटुनुई बेटावर राहते. ती बेटावरील लोकांचे रक्षण करण्याचे प्रयत्न करत असते. तिला कायम वाटतं आपल्या बेटावरील रहिवासी कायम आनंदीत आणि सुरक्षित राहावेत.  तिचे वडील एका विशिष्ट कारणामुळे ‘Moana’ला समुद्रात जाऊ देत नाही.  पण एकेदिवशी ती वडिलांना न सांगता समुद्राच्या यात्रेत निघून जाते.     

समुद्रात दैवी शक्ती असलेल्या मावीला शोधण्यासाठी ती जाते. तिला मावीला नक्की का शोधायचं असतं?   प्राण मणी नेमकं काय असतं? त्याचं बेटाशी नक्की काय संबंध? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.  

सिनेमा आहे तरी कसा?

एका ओळीत या सिनेमाबद्दल सांगायचं झाल्यास,  ही एक अनावश्यक फिल्म आहे. हा सिनेमा साकारण्याची विशेष गरज नव्हती.  या सिनेमात काही क्रिएटिव्हच्या दृष्टीने जोडले गेले नसेल तर,  या सिनेमाचा रिमेक बनवण्यामागचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतो. या सिनेमाचा  सेटअप ठीकठाक आहे.  3Dचा काही खास प्रभाव पडत नाही.   गाणी चांगली आहेत. स्टोरी टेलिंग पण ठीक आहे.  पण समस्या इथे आहे की, प्रेक्षकांनी हे सर्व 2016 रिलीज झालेल्या ‘Moana’ या सिनेमातून पाहिलं आहे. या रिमेक सिनेमात खास नवीन काही जोडलं गेलं नाही.  जर तुम्ही 2016साली प्रदर्शित झालेला ‘Moana’ हा सिनेमा पाहिला असेल तर, रिमेक सिनेमा तुम्हाला निराश करेल. पण जर तुम्ही तो सिनेमा पाहीला नसेल तर, हा सिनेमा आपण आपल्या मुलांसह पाहू शकता.

अॅक्टिंग

Dwayne Johnson या अभिनेत्याने या सिनेमात जबरदस्त काम केलं आहे. त्याचे चाहते हा सिनेमा आवडीने पाहू शकतात.  त्याची कॉमिक टाइमिंग अप्रतिम आहे.  Dwayne Johnson याचे पात्र हलके फुलके असले तरी, या सिनेमासाठी महत्त्वाचे आहे. Catherine Laga’aia  या सिनेमात खूप क्यूट दिसत आहे. ‘Moana’ हे पात्र साकारण्यासाठी तिनं जीव ओतून काम केलंय. Rena Owen हिनं देखील या सिनेमात चांगलं काम केलं आहे. John Tui यांचीही भूमिका उत्तम होती. ओव्हरऑल या सिनेमातील कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे.

‘Moana’ या सिनेमाचं दिग्दर्शन Thomas Kail यांनी केले असून, Jared Bush आणि Dana Ledoux Miller लिखीत हा सिनेमा 10 जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला. रायटिंगमध्ये विशेष काही नवीन नाही.  दिग्दर्शन देखील ठीकठाक आहे. ही फिल्म केवळ त्या लोकांनाच आवडेल, ज्यांनी 2016 साली प्रदर्शित झालेला अॅनिमेडेट ‘Moana’  हा सिनेमा पाहिला असेल. ओव्हरऑल हा एक एव्हरेज सिनेमा आहे.

रेटिंग स्टार – 2.5/5

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘मला कुणासोबतही शारीरिक संबंध…’; आकांक्षा चमोलाचा ‘लॉक अप 2’मध्ये मोठा खुलासा म्हणाली, माझा घटस्फोट…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *