Marathi TV Actress Madhavi Nimkar Becomes Businesswomen: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं…


Marathi TV Actress Madhavi Nimkar Becomes Businesswomen: अनेक सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) इंडस्ट्री गाजवत आहेतच, पण त्यासोबतच त्यांनी व्यावसाय क्षेत्रातही पाऊल ठेवलंय. कोणी हॉटेल व्यवसायात उतरलंय, तर कोणी क्लोथिंग ब्रँड, सलून किंवा इतर उद्योग सुरू केलेत. ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe), श्रेया बुगडे (Shreya Bugde), अनघा भगरे (Anagha Bhagare), मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis) आणि नुकतेच अभिनेता समीर खांडेकर यांनी दादरमध्ये ‘पिठीभात’ हॉटेल सुरू केल्यानंतर आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) हिनंही हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल टाकत बिजनेसवुमन म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
 
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय खलनायिका अभिनेत्री माधवी निमकर आता स्वतःचा व्यावसाय सुरू करत आहे. तिनं हॉटेल विश्वात पदार्पण करण्याचं ठरवलं आहे. नव्या व्यवसायाची आणि या नव्या प्रवासाची घोषणा तिने सोशल मीडियावरुन केली आहे. मराठी अभिनेत्री माधवी निमकर हिनं इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मोठी घोषणा… काहीतरी मोठं… लवकरच असं लिहिलंय. तर या व्हिडीओच्या शेवटी तिनं ‘कल्याणमस्तू…स्वाद आणि आशिर्वाद’, असं तिच्या हॉटेलचं नावंही जाहीर केलंय. माधवीचं हे हॉटेल कल्याणमध्ये असेल.याबाबतची अधिक माहिती माधवी लवकरच चाहत्यांना देणार आहे. माधवीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करुन चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.  

सेलिब्रिटींकडून माधवी निमकरवर शुभेच्छांचा वर्षाव (Madhavi Nimkar Becomes Businesswomen)

माधवी निमकरनं आपल्या हॉटेलच्या नावाची घोषणा करतात, तिच्या फॉलोअर्सकडून आणि तिच्या सहकलाकारांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तिची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील सहकलाकार गौरी म्हणजेच, गिरीजा प्रभूनं तिचा पोस्टवर कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.  याशिवाय ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री मिनाक्षी राठोड हिनंही तिचं अभिनंदन केलंय. 

दरम्यान, स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी या पात्रामुळे ती घराघरांत प्रसिद्ध झाली. तिनं मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. पण, तिनं साकारलेल्या खलनायिकेच्या प्रेमात अख्खा महाराष्ट्र पडला. याव्यतिरिक्त माधवी निमकरनं ‘पुढचं पाऊल’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘चार दिवस सासूचे’, ‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘कुंकू’ यांसारख्या मालिकांमध्येही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. माधवीनं काही सिनेमांमध्येही उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यात ‘पावनखिंड’, ‘संघर्ष’, ‘नवरा माझा भवरा’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

‘लगान’मध्ये भुवनला क्रिकेट शिकवणारी ब्रिटिश एलिजाबेथ आठवतेय का? 25 वर्षांनी आमिर खानसोबत दिसली गोरी मेम, आता करतेय तरी काय? PHOTOs





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *