Last Updated:
सध्या देशात नीरज शर्मा हत्याकांड चांगलंच गाजत आहे. नीरज यांची हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर त्यांची २३ वर्षीय मुलगी आयुषी शर्मा हिने केली आहे.
सध्या देशात नीरज शर्मा हत्याकांड चांगलंच गाजत आहे. नीरज यांची हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर त्यांची २३ वर्षीय मुलगी आयुषी शर्मा हिने केली आहे. अनुकंपा तत्वावर आईला मिळालेली नोकरी आपल्याला मिळावी आणि वडिलोपार्जित सगळी संपत्ती मिळावी, या कारणातून आयुषीने सुपारी देऊन आईचा काटा काढल्याचा आरोप आहे. तिने तब्बल ७ लाखांची सुपारी देऊन आईची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयुषीला अटक केली आहे.
मात्र आता या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी आयुषी ही आपल्याच चुलत भावासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती आहे. तिने प्रियकर असलेल्या आपल्या भावाच्या सांगण्यावरूनच ही हत्या घडवून आणल्याचा संशय आहे. मृत नीरज शर्मा यांच्या भावाच्या वकिलाने याबाबत खळबळजनक दावे केले आहे.
वकिलांनी नेमका दावा काय केला?
नीरज यांच्या भावाच्या वकिलाने केलेल्या दाव्यानुसार, आयूषी ही तिच्या चुलत भावासोबत गेल्या वर्षभरापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याचा काळात आयूषीच्या वागण्यात मोठा बदल झाला. चुलत भावाच्या सनिध्यातच आयुषीने कुटुंबाच्या संपत्तीवर डोळा ठेऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
जयपुरमध्ये संपत्ती आणि अनुकंपा तत्वावर मिळालेली नोकरी मिळवण्यासाठी 23 वर्षीय आयुषीने आपल्या आईच्याच हत्येचा कट रचला. 4 जुलै रोजी नीरज शर्मा यांचा स्कॉर्पिओ वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होते. नीरज यांचे भाऊ राकेश यांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचं निष्पन्न झालं.
चुलत भावासोबत वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनमध्ये होती आयुषी?
या प्रकरणात पोलिसांनी नीरज शर्मा यांची मुलगी आयूषी शर्मा, तिचे काका मोहन स्वरूप आणि इतर आरोपींना अटक केली. या कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप असलेला मोहन स्वरूप यांचा मुलगा बलराज उर्फ रवी अद्याप फरार आहे. आयुषी स्वतःची विधवा आई आणि भावापासून वेगळी राहत होती. आयूषी गेल्या एक वर्षापासून तिचा चुलत भाऊ बलराम उर्फ रवी याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय, पण पोलिसांकडून याबाबत काही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. चंद्रप्रकाश यांच्या मते, आयूषी अभ्यासात प्रचंड हुशार होती. ती आई वडिलांच्या सोबत असायची, पण बलरामच्या सानिध्यात आल्यानंतर तिची वागणूक पूर्णपणे बदलली .
आयुषीच्या प्रियकराचा होता संपत्तीवर डोळा?
वकिलांच्या दाव्यानुसार, बलराज हा बेरोजगार असल्याने तो शर्मा कुटुंबियांची सगळी मालमत्ता आपल्या ताब्यात घेणाचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने आधी आपले काका विजय शर्मा यांच्या हत्येचा कट रचला आणि नंतर काकू नीरज यांना मारण्याची योजना आखली. या संपूर्ण कटात त्याने आयुषीचा वापर केल्याचा आरोप आहे.
ज्या कुटुंबाने मदत केली त्यांनाच दिला धोका
विजय शर्मा हे न्यायालयात कोर्ट मास्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी बलराजला ‘एलएलबी’चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. मात्र त्यांनंतर बलराजने वकिली व्यवसाय केला नाही. ज्या कुटुंबाने आधार दिला त्याच कुटुंबाविरोधात कट रचल्याचा आरोप आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
चुलत भावासोबतच लिव्ह इनमध्ये राहत होती आयुषी? सुपारी देऊन आईची हत्या केलेल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
