Pune News: पुण्यात पुन्हा एकदा खाकीवर हात, वाहतूक नियंत्रण करण्याऱ्या पोलिसाला तिघांकडून बेदम मारहाण


Pune crime news: पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हे गुन्हेगार आता पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. मार्केट यार्ड परिसरात वाहतूक पोलिसाला ट्रकचालक आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली आहे,.

Nagpur Crime
Traffic policeman brutally beaten up by three people in Pune(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
पुणे, अभिजित दराडे : पुणे शहरातील गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनत चालली आहे. दिवसेंदिवस पुणे शहरातील गुन्हेगारांमध्ये वाढच होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये आता सामान्य नागरिकांसह पोलिसांना सुद्धा लक्ष करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलीसांवर हल्ल्याची घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात वाहतुकीचे नियंत्रण करत असताना एका पोलीस हवालदारावर ट्रकचालक व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्यांची नावे सुमीत सुभाष सरकटे (३४, रा. खराडी, नगर रस्ता), अक्षय नानासाहेब शिंदे (३०, रा. तळवडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि मनजीत सुभाष कांबळे (२८, रा. घोरपडी गाव) अशी आहेत. या प्रकरणात हवालदार महेश सुभाष साळुंखे (३९, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली असून ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
Maharashtra Times‘देशावर संकट आल्यावर मोठे लोक माझं नाव घेतात’, शरद पवारांचं विधान चर्चेतअधिक माहिती अशी की, गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास साळुंखे हे ड्युटी संपवून घरी जात होते. त्यावेळी मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौकाजवळून एक ट्रक अतिवेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. अपघात होण्याची शक्यता ओळखून त्यांनी तत्परतेने ट्रकला प्रवेशद्वार क्रमांक ९ जवळ अडवले. त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी चालकाला धोपटण्याचा प्रयत्न केला, मात्र साळुंखे यांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले.

यानंतर ट्रकचालकाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच आरोपींनी साळुंखे यांच्यावर हल्ला चढवला. हातातील धातूच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला. जखमी अवस्थेतही साळुंखे यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

या घटनेनंतर मार्केट यार्ड पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून आरोपींना शोध मोहीम राबवली आणि काही तासांतच तिघांना अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिसांकडून सुरू आहे. अलीकडच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा