Nashik Accident News: नाशिकमध्ये पहाटे भीषण अपघात; सोमठाणे घाटात प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू


Nashik Accident News: येवला-नांदगाव राज्य महामार्गावरील (State Highway) सोमठाणे जोश घाटात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण दुर्घटना (Accident) घडली आहे. प्रवाशांनी भरलेली एक खाजगी लक्झरी बस उलटल्याने (Luxury Bus Accident) एका प्रवाशाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे, तर 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खाजगी लक्झरी बस मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) होती. आज पहाटे सोमठाणे जोश घाटातून जात असताना, अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस घाटातच उलटली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. बस पलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ आणि किंकाळ्या ऐकायला मिळाल्या.

Nashik Accident News: 5 ते 6 प्रवासी जखमी

या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 5 ते 6 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nashik Accident News: वाहतूक पूर्णपणे ठप्प

अपघात एवढा भीषण होता की, लक्झरी बस थेट रस्त्याच्या मधोमध आडवी झाली. यामुळे येवला-नांदगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाकडून बस बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Moshi Building Collapse: मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ‘एबीपी माझा’ने पर्दाफाश केल्यानंतर आयुक्तांना जाग

Ahilyanagar Crime News: माझं नाव माईकवर का घेतलं नाही? अहिल्यानगरमध्ये लग्नात तलाठ्याची गुंडगिरी; सूत्रसंचालकाच्या थेट डोक्यात मारला माईक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *