US Iran Conflict: अमेरिका आणि इराण (US vs Iran) यांच्यामधील तणाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अशातच अमेरिकेने सलग तिसऱ्या रात्री इराणच्या अनेक लष्करी तळांवर हवाई हल्ले (US Iran Conflict) केले आहेत. अमेरिकन लष्कराच्या मते, या हल्ल्यांचा उद्देश इराणची ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि सागरी पाळत ठेवण्याची क्षमता कमकुवत करणे, तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (U.S. President Donald Trump) यांनी इराणला पुन्हा एकदा धमकीही दिली आहे.
US Iran Conflict CENTCOM : सेंट्रकॉमने हल्ल्यांच्या उद्देशाबद्दल दिले स्पष्टीकरण
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंट्रकॉम) ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, ही कारवाई राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. लष्कराच्या मते, इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याने त्यांची हल्ला करण्याची क्षमता सतत कमकुवत होत आहे. दरम्यान, इराणी माध्यमांनुसार, बंदर अब्बास, किश बेट, बुशेहर प्रांतातील जाम शहर आणि केशम बेटावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर अनेक मोठे स्फोट ऐकू आले.
Donald Trump: ट्रम्प यांनी ‘पिकॅक्स माउंटन’ला लक्ष्य केले
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाई सुरू राहू शकते असे संकेत दिले आहेत. ही मोहीम दोन ते तीन आठवडे चालू शकते असा दावाही त्यांनी केला. इराणी पर्वतांमध्ये खोलवर वसलेल्या, ‘पिकॅक्स माउंटन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अत्यंत सुरक्षित कुह-ए-कोलांग गज-ला या ठिकाणाचेही त्यांनी संभाव्य लक्ष्य म्हणून नाव घेतले. यासाठी इराणने तयार राहिले पाहिजे, असे ट्रम्प म्हणाले.
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाढता वाद
या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणविरुद्ध सागरी नाकेबंदी पुन्हा लागू करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणी जहाजांना या मार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, तर इतर देशांच्या जहाजांकडून सुरक्षेसाठी 20 टक्के शुल्क आकारले जाईल. स्वतःला होर्मुझ सामुद्रधुनीचा संरक्षक म्हणवून घेत, ट्रम्प म्हणाले की सागरी सुरक्षा राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असून, येथून जागतिक स्तरावर व्यापार होणाऱ्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा सुमारे 20 टक्के पुरवठा होतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से