शुबमन गिलवर किती विश्वास ठेवायचा? विराट कोहलीकडून फार अपेक्षा नाहीत! हा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा – Marathi News | Virat Kohli and Shubman Gill stumbled during practice ahead of the first ODI against England watch video


शुबमन गिलवर किती विश्वास ठेवायचा? विराट कोहलीकडून फार अपेक्षा नाहीत! हा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवाImage Credit source: Getty Images

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. ही मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. आधीच इंग्लंडने भारताला 4-0 ने टी20 मालिकेत नमवलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. अशा स्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील 14 जुलैला होणारा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व समजून टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. पण कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहलीच्या एका व्हिडीओमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसं घाबरण्याचं काही कारण नाही. कारण हा सरावादरम्यानचा व्हिडीओ आहे. दोन्ही दिग्गज फलंदाज नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना अडचणीत दिसले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विराट कोहली आणि शुबमन गिलला अडचण

कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहली एजबेस्टन वनडे सामन्यापूर्वी केलेल्या सराव शिबिरात अडचणीत दिसले. शुबमन गिल एका चेंडूचा सामना करताना अडखळला आणि त्याची त्रिफळा उडाला. विराट कोहलीच गतही काही वेगळी नव्हती. विराट कोहली गोलंदाजांचा सामना करताना अडचणीत दिसला. त्याच्या बॅटच्या मधे चेंडू लागत नव्हता. त्यामुळे त्यांचा असा सराव पाहून क्रीडाप्रेमींच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. कारण सरावात चेंडूचा सामना करताना अडचण येत असेल तर हे खेळाडू लयीत नाहीत. त्यामुळे या दोन खेळाडूंकडून मोठी खेळी करण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल.

शुबमन गिल पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळणार

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये वनडे मालिका खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वात कसोटी मालिका खेळली होती आणि 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. दरम्यान, शुबमन गिल इंग्लंडमध्ये कधीच वनडे सामना खेळलेला नाही. पण शुबमन गिलची वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी आहे. त्याने 64 वनडे सामन्यात 59हून अधिकच्या सरासरीने 3191 धावा केल्या आहेत. यात 18 अर्धशतकं, 9 शतकं आहेत.

दुसरीकडे, विराट कोहलीचा इंग्लंडमधील रेकॉर्ड सुमार आहे. त्याने वनडेत 58हून अधिक सरासरीने 14797 धावा केल्या आहेत. पण इंग्लंडमध्ये त्याने 38.73 च्या सरासरीने 581 धावाच केल्या आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *