Marathi Actor On Viral Vaidu Video: सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ही लहानगी वैदू तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे सध्या महाराष्ट्रभर गाजतेय. राज्यभरातून अनेक जण वैदुचा व्हिडिओ वरून रील बनवताना दिसतायत. कधी मांजर मागायला आलेली वैदू तर कधीही तिचा बोली भाषेत गप्पा मारताना दिसणारी लहान मुलगी रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या डायलॉगवर अनेक मीम्स बनवले जात आहेत. दरम्यान, व्हायरल वैदूच्या या व्हिडिओवर मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गिरीश परदेशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या तोंडी शुभंकरोती वदवण्याची परंपरा असताना घाण शिव्या त्या मुलीचा मुखी देऊन तिला प्रसिद्धी देण्यात आपण त्यांचे भविष्य कुठे नेतो याचा विचार व्हायला हवा. असं म्हणत अभिनेत्याने लहान मुलीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले गिरीश परदेशी ?
झी मराठीवरील ‘या सुखांनो या’, ‘वहिनीसाहेब ‘यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपले हक्काचे स्थान निर्माण करणारे अभिनेते गिरीश परदेशी यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वैदू मोरेच्या प्रसिद्धी वरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले ‘लहान मुलांच्या तोंडी शुभं करोती वडवण्याची परंपरा आपली! तेच आपले संस्कार, घाण शिव्या त्यांच्या मुखी देऊन त्याला प्रसिद्ध देण्यात त्यांचे भविष्य आपण कुठे नेतोय याचा विचार व्हायला हवा. बाकी जैसे होत आहे तेथे पाहावे किंवा( पाहून न पाहिल्यासारखे करावे) आणि मग दुर्लक्ष करावे.असं म्हणत त्यांनी पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत असून अनेक जण त्यांच्या मताशी सहमत असल्याचं कमेंट करत म्हणत आहेत. ‘कलाकारकट्टा’ ने यासंदर्भातील पोस्ट शेअर केलीय.
अभिनेता गिरीश परदेशी यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका नंतर काही चित्रपटही त्यांनी केले.2016 नंतर अभिनयातून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर जवळपास 18 वर्षांनी ते झी मराठीवरील इच्छाधारी नागिन या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
वैदूच्या व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?
सध्या सोशल मीडियावर वैदू नावाच्या एका लहान मुलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती तिच्या बोलीभाषेत एका काकूंशी गप्पा मारताना दिसते. कुणीतरी तिच्याकडे पार्टी मागितलेली असते आणि त्यावरून ती त्यांना काय बोलली, हे वैदू समोर बसलेल्या काकूंना सांगत असते. हे बोलत असताना ती काही शिव्याही देते. तेवढ्या निरागसपणे बोलताना दिसते, त्यामुळे अनेक जण तिचं कौतुक करत आहेत. व्हायरल वैदू नावाने ती ट्रेंड होतेय. ‘तिच्या अनेक डायलॉगचे मीम बनत आहेत.
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव